Ind vs Aus Virat Kohli : दिल्लीतील अरूण जेटली स्टेडीअम सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याच्या आरोप भारतीय फॅन्स करत आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याप्रकरणी विराट चांगलाच संतापला आहे. थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाच्या पहिल्या डावात ही घटना घडलीय. (virat kohli lbw drs spark debate controversy richard illingworth controversial decision ind vs aus 2nd test)
दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. या डावात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूवर पहिल्या मैदानी पंचाने एलबीडब्ल्यू दिले. यावेळी विराटने (Virat Kohli) रिव्ह्यू घेतला, त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) यांनी त्याला बाद घोषित केले. रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.या व्हिडिओवर नेटकरी विराट आऊट आहे की नॉट आऊट याबाबत प्रतिक्रिया देत आहेत.
Ok now its up to you janta
U decide Virat Kohli was out or not out
Retweet if u think Not Out#INDvsAUS#AUSvsIND pic.twitter.com/4XsmKrKmz4 — Vaibhav (@vabby_16) February 18, 2023
विराट कोहलीच्या (Virat Kohli) या विकेटचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत पाहिल्यास, बॉल विराट कोहलीच्या बॅट आणि पॅडला एकाच वेळी आदळताना दिसत आहे.अशा परिस्थितीत बेनफीट ऑफ डाऊट नेहमीच फलंदाजाच्या बाजूने जातो, परंतु यावेळी थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) यांनी फलंदाजाला आऊट घोषित केले. या घटनेनंतर भारतीय फॅन्स चांगलेच भडकले असून त्यांनी सोशल मीडियावर अंपायरविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समालोचक आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही थर्ड अंपायरच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.
दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) शानदार खेळी खेळत होता. मात्र थर्ड अंपायरच्या वादग्र्स्त निर्णयाने त्याला मोठी खेळी करता आली नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात विराट कोहलीने (Virat Kohli) 84 बॉलमध्ये 44 धावा केल्या. या खेळीत विराट कोहलीच्या बॅटमधून 4 चौकार आले आहेत.