नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेमधल्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली नाबाद १५६ रन्सवर खेळत आहे. टेस्ट क्रिकेटमधलं विराटचं हे २०वं शतक होतं. तर वनडेमध्ये विराटनं ३२ शतकं लगावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर ५२ शतकं आहेत.
भारताकडून सगळ्यात जलद २० शतकं मारणाऱ्यांच्या यादीमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये विराटनं सचिनला मागे टाकलं आहे. भारताकडून सगळ्यात जलद २० शतकं लगावणाऱ्यांच्या यादीत सुनील गावसकर पहिल्या क्रमांकावर आहेत. गावसकर यांनी ९३ टेस्टमध्ये २० शतकं लगावली आहेत. विराटनं हे रेकॉर्ड १०५ तर सचिननं १०७ मॅचमध्ये केलं होतं.
तीन टेस्ट मॅचमध्ये तीन शतक लगावणारा विराट एकमेव कॅप्टन बनला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६ हजार रन्स बनवण्याचा विश्वविक्रम विराटनं केला आहे. विराटनं ३५० इनिंगमध्ये १६ हजार रन्स बनवल्या आहेत.
विराट कोहली- ३५० इनिंग्स
हाशीम आमला- ३६३ इनिंग्स
ब्रायन लारा- ३७४ इनिंग्स
सचिन तेंडुलकर- ३७६ इनिंग्स
एका कॅलेंडर वर्षामध्ये सगळ्यात जास्त रन्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटनं यावर्षी आत्तापर्यंत २६२७ रन्स बनवल्या आहेत. विराटनं राहुल द्रविडचं रेकॉर्ड मोडलं आहे.
विराट कोहली- २६२७ रन्स- २०१७
राहुल द्रविड- २६२६ रन्स- १९९९
सौरव गांगुली- २५९५ रन्स- १९९९
सचिन तेंडुलकर- २५४१ रन्स- १९९८
वीरेंद्र सेहवाग- २३४९ रन्स- २००३
या सामन्यात त्याने त्याचे टेस्ट क्रिकेटमधील ५ हजार रन्स पूर्ण केले आहेत. भारताकडून सर्वात वेगवान ५ हजार रन्स करण्याच्या बाबतीत विराट कोहली आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत पहिल्या नंबरवर टीम इंडियाचा माजी खेळाडू सुनील गावस्कर आहे. त्याने हा कारनामा १९७९ मध्ये ९५ खेळींमध्ये केला होता.
दुस-या क्रमांकावर विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग हा आहे सेहवागने ९९ खेळींमध्ये २००८ मध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. तिस-या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर हा आहे. त्याने १०३ खेळींमध्ये ५ हजार रन्स केले होते. तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने १०५ इनिंगमध्ये ५ हजार रन्स केले आहेत. त्याच्यानंतर राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरूद्दीन यांचा नंबर येतो.