...म्हणून भारतीय फलदांजांनी केली डाव्या हाताने बॅटिंग

पावसाने भ्रमनिरास केला असला तरी भारतीय बॅट्समन्सच्या या डावखुऱ्या फलंदाजीने प्रेक्षकांचा काही क्षणासाठी विरंगुळा केला. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 14, 2017, 06:26 PM IST
...म्हणून भारतीय फलदांजांनी केली डाव्या हाताने बॅटिंग

नवी दिल्ली : भारत आणि आणि ऑस्ट्रेलिया संघातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पण यावेळी भारतीय बॅट्समन्सच्या डाव्या हाताची फलंदाजी प्रेक्षकांना मैदानावर पाहायला मिळत होती. पावसाने भ्रमनिरास केला असला तरी भारतीय बॅट्समन्सच्या या डावखुऱ्या फलंदाजीने प्रेक्षकांचा काही क्षणासाठी विरंगुळा केला. 

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी २० चा हा सामना होणार होता. पावसानंतरही ग्राऊंड स्टाफने आपला सर्वोत्तम प्रयत्न केला. पण मैदानाची स्थिती खेळण्याजोगी नसल्याचे समोर आले. कर्णधार विराट कोहली आणि महेंदसिंग धोणीने 
डाव्या हाताने फंलदाजीचा सराव करण्यास सुरूवात केली. दरम्यान रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांनीही डाव्या हाताने फलंदाजी केली.

याआधीही विराट कोहलीचा डाव्या हाताने फलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या एकदिवसीय मालिकेत ४-१ असा विजय मिळवला.  तर टी-२० सामन्यांची मालिका भारताने जिंकली असती तर भारत टी २० च्या क्रमवारीतही अव्वल स्थानी पोचणार होती. पण टी २० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. त्यामूळे भारताला आयसीसी क्रमवारीत अव्वल येण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. न्यूझीलंडविरोधात २२ ऑक्टोबरपासून ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे.