मुंबई : चार वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची नजर यंदाच्याही आयपीएल ट्रॉफीवर आहे. धोनी सीएसकेचा कर्णधार आहे, मात्र धोनीनंतर ही कमान कोण सांभाळणार यावर चर्चा सुरु झाली. दरम्यान भविष्यात सीएसकेच्या कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार यावर माजी खेळाडू आकाश चोप्राने त्याचं मत व्यक्त केलं आहे.
आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्जमध्ये एका लीडर बनवण्याची गरज आहे. मात्र प्रश्न असा आहे की, लीडर कसा तयार करायचा. जर टीम सिझनच्या सुरुवातीला जर तुम्ही उप-कर्णधार निवडला तर समजू शकेल की तो खेळाडू किती इनपूट्स देतोय.
रविंद्र जडेजा आणि मोईन अली यांच्यासारखे खेळाडू लीडरशीप ग्रुपचा भाग आहेत. मात्र जिथे महेंद्रसिंग धोनी आहे, तिथे सगळ्या गोष्टी थांबतात. जडेजाकडे टीमचा नवा लीडर म्हणून पाहिलं जातंय. कारण टीम मॅनेजमेंटने त्याला धोनीपेक्षा अधिक पैसे देऊन रिटेन केलं आहे, असं आकाश चोप्राचं म्हणणं आहे.
चेन्नई सुपर किंग्जने रविंद्र जडेजाला 16 कोटी रूपये देऊन रिटेन केलं. तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीला यावेळी 12 कोटी रूपये देण्यात आले. याचसोबत दीपक चाहरला 14 कोटी रूपयांना टीमने खरेदी केलं.
आयपीएल सुरु होण्यासाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत. येत्या 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. सिझनचा पहिला सामना कोलकाता नाईड रायडर्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज असणार आहे. तर यंदाच्या सिझनची फायनल 29 मे रोजी खेळली जाणार आहे.