दुबई : क्रिकेट विश्वात दररोज नवनवीन रेकॉर्ड बनत असतात. अशाच एका नव्या रेकॉर्डची आणखी एक नोंद झाली आहे. केवळ २५ बॉलमध्ये शतक ठोकण्याची कामगिरी विल जेक्स या खेळाडूनी केली आहे. या खेळीमुळे क्रिकेट विश्वातील सर्वाधिक वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे झाला आहे.
दुबईत टी- १० ही तिरंगी सीरिजमध्ये ही मॅच खेळली गेली. विशेष म्हणजे ही मॅच १० ओव्हरची होती. या सीरिजमध्ये काल गुरुवारी सरे काउंटी क्रिकेट क्लब विरुद्ध लँकशायर क्रिकेट क्लब या टीममध्ये ही मॅच पार पडली. सरे टीमच्या विल जेक्स या पठ्ठयानं केवळ ३० बॉलमध्ये तब्बल १०५ रनची तुफानी खेळी केली. यात त्याने ११ सिक्स तर ८ फोर लगावले.
8⃣ fours
1⃣1⃣sixes including six in an over@wjacks9' 100 in 25 balls against @lancscricket pic.twitter.com/HKwfv4RXfq— Surrey Cricket (@surreycricket) March 21, 2019
विल जेक्सने आपले अर्धशतकं १४ बॉलमध्ये पूर्ण केलं. यानंतर त्याने एका आोव्हरमध्ये ६ सिक्स लगावण्याची कामगिरी केली. त्याने स्टीफन पॅरीच्या बॉलिंगवर सहा सिक्स लगावले. या फटकेबाजीमुळे त्याने ६२ रनवरुन ९८ रनचा टप्पा गाठला. त्याने आपले शतक २५ बॉलमध्ये पूर्ण केले. या शतकी खेळीमुळे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या बॅट्समनने लगावलेलं हे आतापर्यंतचे जलद शतक ठरलयं. विल जॅक्सच्या या तुफानी खेळीमुळे सरे काउंटी क्रिकेट क्लब टीमला १० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७६ रन करता आल्या. १७७ रनचे आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या लंकाशायरला १० ओेव्हर खेळून ९ विकेटच्या मोबदल्यात फक्त ८१ रन करता आल्या. यामुळे सरे टीमचा ९५ रनने विजय झाला.
या मॅचला अधिकृत दर्जा नव्हता. पण जर या मॅचला अधिकृत दर्जा प्राप्त असता तर क्रिकेट विश्वातील सर्वाधिक वेगवान शतकं म्हणून या शतकाची नोंद झाली असती. आयपीएल मध्ये क्रिस गेलने २०१३ ला ३० बॉलमध्ये वेगवान शतकं ठोकलं होतं. जर या मॅचला अधिकृत दर्जा असता तर निश्चितीच क्रिस गेलचा जलद शतक करण्याचा रेकॉर्ड मोडीत निघाला असता.