World Cup 2023 Rohit Sharma Ended Career: भारतात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत इंग्लंडची कामगिरी अगदीच सुमार झाली आहे. 2019 मध्ये विश्वचषक उंचावणारा हा संघ यंदाच्या विश्वचषकात थेट तळाला आहे. त्यातच आता इंग्लंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र या निवृत्तीसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जबाबदार असल्याचा दावा रोहितच्या चाहत्यांनी केला आहे. नेमकं घडलंय काय? हा खेळाडू कोण आहे आणि त्याचा रोहितशी काय संबंध आहे जाणून घेऊयात.
इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर डेविड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डेव्हिड विलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. विश्वचषक स्पर्धेतनंतर डेविड विली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. विश्वचषकात इंग्लंडच्या वाईट कामगिरीने डेविड विली निराश झाल्याची चर्चा आहे. 'हा दिवस कधीच येऊ नये असं आपल्याला वाटत' असं, विलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. खूप विचार केल्यानंतर आपण हा निर्णय घेत असल्याचंही विलीने म्हटलं आहे. आपल्या पोस्टमध्ये विलीने कुटुंबाचेही आभार मानले आहेत. पत्नी, दोन मुलं, आई आणि वडिलांच्या पाठिंब्याशिवाय आपलं स्वप्न पूर्ण करणं अशक्य होतं, असंही विलीने म्हटलं आहे. 33 वर्षांचा वेगवान गोलंदाज डेविड विली 70 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने आणि 43 टी-20 आंतरराष्टीय सामने खेळला आहे.
— David Willey (@david_willey) November 1, 2023
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या इंग्लिश खेळाडूंमध्ये डेविड विलींचा समावेश होतो. डेविड विलीला केवळ 3 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने 42 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र त्याने अचानक निवृत्ती घोषित केल्याने रोहित शर्माने केलेल्या धुलाईमुळे निराश झाल्याने डेविड विलीने निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे.
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात डेविड विलीला एकाच ओव्हरमध्ये 2 षटकार आणि चौकार लगावला. लखनऊमध्ये 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या लो स्कोअरिंग सामन्यामध्ये डेविड विलीने 45 धावांमध्ये 3 बळी घेतले होते. डेविड विलीने त्याच्या एक्स अकाऊंटवरुन (ट्विटर अकाऊंटवरुन) पोस्ट केली आहे. या पोस्टवर अनेकांनी रोहितमुळे डेविड विलीने निवृत्ती घेतल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
1)
Rohit Sharma Ended Your Career
— (@DankShubhum) November 1, 2023
2)
Rohit Sharma ended another Career
— Sir Dinda (@FuriousDinda) November 1, 2023
3)
Rohit Sharma ended career
Best of luck for future— Golden Era (@Reign_of_Rohit) November 1, 2023
4)
You Had A Great Career bro, should have been part of 2019WC too,Best of luck pic.twitter.com/sScwYlhbuL
— Ansh (@141Adelaide_) November 1, 2023
5)
David Willey to take retirement after this world cup.
Another career destroyed by Rohit Sharma. pic.twitter.com/kwV1rIlnvF
— Ansh Shah (@asmemesss) November 1, 2023
6)
No way Rohit Sharma ended another career
— time square (@time__square) November 1, 2023
एकीकडे रोहितमुळे डेविड विली निवृत्ती घेत असल्याची चर्चा असतानाच स्वत: डेविड विलीने आपल्या निवृत्तीच्या निर्णयाचा वर्ल्ड कपमधील कामगिरीशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. "मी क्रिकेट खेळू शकत असतानाही मैदानाबाहेर राहून संघासाठी बरंच काही करु शकतो असा मला विश्वास आहे. माझ्या निवृत्तीचा वर्ल्ड कपमधील कामगिरीशी काहीही संबंध नाही," असं डेविड विली म्हणाला आहे.
इंग्लंडचा संघ तळाला असल्याने सेमीफायनल्समध्ये ते पात्र होण्याची शक्यता अगदी 1 टक्के आहे. इंग्लंडने त्यांच्या 6 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. बांगलादेशच्या संघाला वगळता इंग्लंडच्या संघाला कोणालाच पराभूत करता आलं नाही.