अमरावती

अमरावतीत राष्ट्रवादीत संघर्ष, पक्ष सोडण्याची धमकी

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा संघर्ष इरेला पेटला आहे. अमरावतीची उमेदवारी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना दिली जाणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतले निष्ठावान कार्यकर्ते पक्ष निरीक्षकांवरच भडकले. राणांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास पक्ष सोडून देण्याची धमकी सरचिटणीस संजय खोडके यांनी दिलीय.

Feb 8, 2014, 09:04 PM IST

एका अपघातानं केला देशी कट्ट्यांच्या तस्करीचा भांडाफोड

एका अपघातानं देशी तस्करींचा भांडाफोड केलाय. अमरावतीजवळ ही घटना घडलीय. मुख्य म्हणजे, देशी कट्ट्यांच्या या तस्करीत एका जोडप्याला अटक करण्यात आलीय.

Dec 24, 2013, 07:01 PM IST

गोळी लागून अमरावतीच्या महिला जवानाचा मणिपूरमध्ये मृत्यू

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची महिला सैनिक प्रीती बोळे हिचा गोळी लागून मृत्यू झाला. ती मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आपले कर्तव्य बजावत होती. प्रीती ही अमरावतीची आहे. दीड वर्षांपूर्वीच ती सीआयएसएफमध्ये रुजू झाली होती.

Nov 22, 2013, 08:50 PM IST

अमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले

अमरावती येथे चक्क आमदार साहेबांनाचा मार खावा लागला. दहीहंडीचा काल उत्सव सुरू होता. याचवेळी दहीहंडी बक्षीस वितरण कार्यक्रमात एकाने घुसखोरी केली आणि आमदारांना जोरदार धप्पड मारली. या प्रकाराने कार्यक्रमात गोंधळ उडाला.

Aug 30, 2013, 10:07 AM IST

जबरदस्तीचा विवाह करुन डांबलं, पहिल्या पत्नीच्या मदतीनं सुटका

महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतेय. घरगुती हिंसांचं प्रमाणही पुरोगामी महाराष्ट्रात वाढतंय. नुकतीच पहिला विवाह झाला असताना, दुसरीसोबत जबरदस्तीनं दुसरा विवाह करुन एका महिलेला तीन वर्ष घरात डांबून ठेवलं असल्याची घटना उघड झाली. अखेर पहिल्या पत्नीच्या मदतीनं त्या नराधमाच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यात आली आणि आरोपीला अटक झाली.

Aug 29, 2013, 11:35 AM IST

प्राध्यापिकेचे फेसबुकवर अश्लील प्रोफाईल

गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापिकेच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून त्यावर अश्लील छायाचित्र आणि क्लिपिंग अपलोड केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Jul 10, 2013, 12:02 PM IST

नोकरीचं अमिष दाखविणाऱ्या बबली बंटीला अटक

सरकारी नोकरीचं अमिष दाखवून राज्यातल्या हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या बंटी बबलीचा अमरावती पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हेमराज आणि रुपाली पाटोडेकर असं या बंटी बबलीचं नाव आहे. त्यांनी महिला व्यवसाय प्रसिक्षण संस्थेच्या नावाखाली ही फसवणूक केलीये.

Apr 15, 2013, 02:24 PM IST

दुष्काळासाठी असणारा पैसा जातो कुठे?- राज

गेल्या काही सभांमधून राज ठाकरे अजितदादांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अमरावतीतल्या सभेतही अजितदादांना लक्ष्य केलं. सिंचनकामांचे ७० हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल त्यांनी केला.

Mar 25, 2013, 12:07 AM IST

सरकार निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं- राज

राज ठाकरेंनी सभेच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्याच वक्तव्याचे दाखले देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले.

Mar 24, 2013, 11:23 PM IST

अजित पवार, ७० हजार कोटी रुपये गेले कुठे? - राज

अमरावती येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. सिंचनाचं पाणी इंडियाबुल्सला देऊ नका असं सभेपूर्वीच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.

Mar 24, 2013, 08:29 PM IST

राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार आहे. राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सा-याचं लक्ष लागलं आहे.

Mar 24, 2013, 08:47 AM IST

... तर माझा प्रकल्पांना विरोध - राज ठाकरे

मरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय.

Mar 23, 2013, 07:49 PM IST

प्राध्यापकांचा असहकार; परीक्षा लांबणीवर

प्राध्यपकांच्या आंदोलनामुळं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं तसंच अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठानं परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकल्यात.

Mar 16, 2013, 05:20 PM IST

गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही - उद्धव

मी देखील लहानपणापासून गर्दी पाहत आलोय, त्यामुळे अशी गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही.. गर्दी होते पण त्याचं मतामध्ये कुठं रुपांतर होतयं?

Mar 9, 2013, 06:54 PM IST

स्कूल व्हॅनचा अपघात; चार चिमुकले ठार, नऊ जखमी

अमरावतीत एका स्कूल व्हॅनला भीषण अपघात झालाय. अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दहा विद्यार्थी जखमी झालेत. दोन मुलांना किरकोळ जखमा झाल्यात.

Nov 27, 2012, 01:41 PM IST