पंतप्रधान मोदी करणार बड्या कंपन्यांच्या सीईओंना संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय ऐतिहासिक इस्त्रायल दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. इस्त्रायल आणि भारताच्या बड्या कंपन्यांच्या सीईओच्या संयुक्त परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर हैफा शहरात असणाऱ्या पहिल्या महायुद्धात मृत्यू पावलेल्यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून आपला दौरा संपवतील. दुपारनंतर मोदी जर्मनीला रवाना होतील.
Jul 6, 2017, 08:55 AM ISTमोदींच्या इस्राईल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला
पंतप्रधानांच्या इस्त्रायल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असा दावा इस्त्रायलचे भारतातले वाणिज्य दूत डेव्हिड अकाव यांनी केला आहे. भारताबाहेर सर्वाधिक मराठी बोलणारी जनता इस्त्रायलमध्ये राहते. त्यामुळे आमच्या देशाशी महाराष्ट्राचे जवळचे संबंध असल्याचं अकाव म्हणाले.
Jul 5, 2017, 09:50 AM ISTपंतप्रधान मोदींना इस्राईल दौऱ्यात मिळणार सरप्राईज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्राईल दौरा आजपासून सुरु होत आहे. इस्राईल दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ऐतिहासिक दौरा ठरणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू प्रोटोकॉल तोडून विमानतळावर पोहोचणार आहेत. इस्राईलच्या दौ-यात पंतप्रधान मोदींना सरप्राइज मिळणार आहेत.
Jul 4, 2017, 11:28 AM ISTमोदींच्या इस्राईल दौऱ्यात गायिका लेआरा इत्झेक गाणार राष्ट्रगीत
मुळची भारतीय आणि इस्रायलची गायिका लेआरा इत्झेक 4 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौ-यावर भारत आणि इस्रायलचे राष्ट्रगीत गाणार आहे.
Jul 3, 2017, 11:26 AM IST