मुंबई : पंतप्रधानांच्या इस्त्रायल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असा दावा इस्त्रायलचे भारतातले वाणिज्य दूत डेव्हिड अकाव यांनी केला आहे. भारताबाहेर सर्वाधिक मराठी बोलणारी जनता इस्त्रायलमध्ये राहते. त्यामुळे आमच्या देशाशी महाराष्ट्राचे जवळचे संबंध असल्याचं अकाव म्हणाले.
२०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस्त्रायलला गेले असताना संबंधांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. आता मोदींच्या दौऱ्यात ही मैत्री आणखी पुढे जाईल असं त्यांनी म्हटलंय. ठिबक सिंचनाच्या इस्त्रायली तंत्रज्ञानाचा मराठवाड्यासारख्या ठिकाणी फायदा उचलता येऊ शकेल, असा दावाही अकाव यांनी केला आहे.