ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेसमोर २८१ रन्सचे टार्गेट

ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेदरम्यान होबार्ट येथे सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २८१ रन्सचे टार्गेट ठेवले आहे.

Feb 24, 2012, 02:05 PM IST

वीरेंद्र सेहवाग मैदानाबाहेर

टीम इंडियाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही. दुखापतीमुळे सेहवागने या सामन्यातून माघार घेतली आहे.

Feb 18, 2012, 02:24 PM IST

रोमहर्षक सामान्यात कांगारूंचा लंकेवर विजय!

ऑस्ट्रेलियानं रोमहर्षक लढतीत श्रीलंकेचा 5 रन्सनं पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये अखेर कांगारूंनी बाजी मारली.

Feb 10, 2012, 07:36 PM IST

इयान चॅपल पुन्हा बरळला

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार इयान चॅपल पुन्हा बरळला आहे. कसोटी सामन्यात टीम इंडियाला लागलेल्या पराभावानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्यांना मुर्ख असे संबोधले आहे.

Feb 4, 2012, 10:53 AM IST

भारतासमोर १३२ धावांचे आव्हान!

भारत- ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ १९.४ षटकात १३१ धावांवर गारद झाला. भारताकडून क्षेत्ररक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तंबूत पाठविले. तर प्रविण कुमार आणि राहुल शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर विनय कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Feb 3, 2012, 06:09 PM IST

इंडिया-ऑस्ट्रेलिया आज दुसरा टी-२० सामना

भारतीय क्रिकेट टीमचा दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. कसोटी मालिकेत पराभून झाल्यानंतरही पहिला टी-२० सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता.भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिका होणार आहे. त्यामुळे भारताला आजच्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. हाच आत्मविश्वास टीम इंडियाला तिरंगी मालिकेसाठी लाभदायक ठरणारा असेल.

Feb 3, 2012, 10:21 AM IST

टी-२० चा संग्राम शुक्रवारी!

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरी टी-20 मॅच शुक्रवारी खेळण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत एकही मॅच न जिंकलेल्या टीम इंडियासमोर कांगारूंना पराभूत करण्याचं कडव आव्हान असणार आहे. तर कांगारूं ही मॅच जिंकून टी-20 सीरिजही खिशात घालण्यासाठी सज्ज आहेत.

Feb 2, 2012, 07:44 PM IST

ऑस्ट्रेलियात जहाजाला जलसमाधी

ऑस्ट्रेलियात जवळपास ३५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाल्याची भिती वर्तविण्यात आली आहे. या वृत्ताला ऑस्टेलियाचे पंतप्रधान जुलिया गिलर्ड यांनी दुजोला दिला आहे. ही घटना पपुआ नवी गुईनी येथे घडली.

Feb 2, 2012, 01:41 PM IST

इंडियाचा लाजीरवाणा पराभव

ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला लाजीरवाणा व्हाइटवॉश मिळाला. कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा तब्बल २९८ धावांनी पराभव केला. या दमदार विजयाच्या बळावर मालिका ४-० अशा मोठ्या फरकाने जिंकण्यात कांगारूंना यश आले आहे.

Jan 28, 2012, 01:07 PM IST

इंडियाची हाराकिरी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारली आहे. टीम इंडियाची हाराकीरी दिसून आली. सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरला आहे. १३ रन्स करून तंबूत परतला आहे. ५०० रन्सचं आव्हान टीम इंडियाला आता पेलणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पराभवाकडे वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.

Jan 27, 2012, 03:36 PM IST

रिकी पॉन्टिंगचे अर्धशतक

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १५४ रन्सच्या बदल्यात ५ विकेट गमावल्या आहेत. तर रिकी पॉन्टिंगने अर्धशतक केले.

Jan 27, 2012, 01:06 PM IST

टीम इंडियाला पहिला धक्का

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव १६७ रन्सवर घोषित केला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर ५०० रन्सचे टार्गेट आहे.

Jan 27, 2012, 11:30 AM IST

ऑस्ट्रेलिया आणि व्दिशतके....

अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन मायकेल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांनी नॉट आऊट डबल सेंच्युरी केली आहे. या दोघांची पार्टनरशिप टीम इंडियाला डोकेदुखी ठरली आहे. टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ओपनर वॉर्नर, कोवन आणि शॉन मार्श या टॉप तीन बॅट्समनला झटपट आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. मात्र, त्यानंतर यश आलं नाही.

Jan 27, 2012, 08:17 AM IST

विराटचे शतक, इंडिया ऑलआऊट

टीम इंडियाच्या विराट कोहलीने झुंजार शतक फटकावून टीमला नवा सूर दाखवून दिला आहे. कसोटी कारर्कीदीतील विराटचे पहिले शतक आहे. ऑस्ट्रेलियात सचिन, लक्ष्मण, द्रविड, सेहवाग यांच्यासारख्या खेळाडूंनी नांगी टाकली असताना विराट खेळी करून टीम इंडियाची इज्जत राखली आहे.

Jan 26, 2012, 02:57 PM IST

विराटची खेळी, साहा आऊट

विराट कोहली आणि बुध्दीमान साहाने शतकी भागिदरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या ६ बाद २२५ रन्स झाल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने साहाची विकेट घेवून पुन्हा एक जोरदार धक्का दिला.

Jan 26, 2012, 11:33 AM IST