केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगाची घोषणा
केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाची घोषणा केलीय. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली.
Sep 25, 2013, 01:20 PM ISTकेंद्रातील काँग्रेस सरकारची नोकर भरतीवर टाच
केंद्र सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने केंद्राने थेट नोकर भरतीवर टाच आणली आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी हे आता अधिक चिंतेचा विषय झाली आहे.
Sep 19, 2013, 09:34 AM ISTयंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांची `दिवाळी`!
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. १ जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे. याचा फायदा देशातल्या ५० लाखांहून अधिक कार्यरत आणि ३० लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं यंदाची दिवाळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जोरात होणार हेच दिसतंय.
Sep 2, 2013, 10:12 AM ISTकेंद्राचे गुन्हेगारीला अभय, तुरूंगातील नेता पात्रच
केंद्रातील सरकारने न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत गुन्हेगारी नेत्याला अभय दिले आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नेता तुरूंगात असेल तर तो अपात्र होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तुरुंगातील व्यक्तींचा हा हक्क अबाधित राखणारा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आलाय.
Aug 28, 2013, 04:49 PM IST`टेलिकॉम` क्षेत्रात १०० टक्के `एफडीआय`ला परवानगी
ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकारनं एक साहसी पाऊल उचलंलय. दूरसंचार अर्थात टेलिकॉम क्षेत्रात सरकारनं १०० टक्के विदेशी गुंतवणूक (एफडीआय)ला परवानगी दिलीय.
Jul 17, 2013, 10:14 AM ISTअॅसिड 'विषा'च्या श्रेणीत, लायसन्सची गरज!
अॅसिडच्या खुल्या विक्रीवर केंद्र सरकारनं आपली भूमिका जाहीर केलीय. देशभरात अॅसिड हल्ल्यांमध्ये झालेली लक्षणिय वाढ लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे मंगळवारी एक ड्राफ्ट सुपूर्द केलाय.
Jul 16, 2013, 03:07 PM ISTकधी ठेवावेत संबंध, १८, १६ की १५ व्या वर्षी?
पुन्हा एकदा सहमतीने संबंध ठेवण्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण न्यायालयाने सहमतीने संबंध ठेवण्याबाबत केंद्र सरकार नोटीस बजावली आहे. केंद्राने आधी १६ वर्षे निश्चित करण्याचे म्हटले होते. परंतु प्रखर विरोध झाल्यानंत निर्णय मागे घेतला. आता १८ वर्षेच वय असावे, अशी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
Jul 11, 2013, 12:13 PM ISTखुशखबर... महागाई भत्ता अन् पीएफ व्याजदर वाढला!
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जून २०१३ पासून आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे.
May 16, 2013, 11:54 AM ISTकेंद्र सरकार झुकलं, डीएमकेची मागणी मान्य
श्रीलंकेत तमिळींवर अन्याय होत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे युनोमध्ये श्रीलंकेविरोधात प्रस्ताव आणण्याबाबत भारताने प्रयत्न करावा. तसेच श्रीलंकेविरोधात आवाज उठवावा, अशी डिएमकेची मागणी होती. मात्र, सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने केंद्रीतील युपीए सरकाचा पाठिंबा डीएमकेने काढला. त्यामुळे केंद्रातील सरकार अडचणीत सापडले होते. डीएमकेपुढे सरकारने गुडघे टेकले. त्यांची मागणी मान्य केल्याने सरकारचा धोका टळला आहे.
Mar 19, 2013, 12:05 PM ISTराज्याला रत्नागिरी वीज प्रकल्प डोईजड
पूर्वीचा बुडीत निघालेला दाभोळ प्रकल्प नव्या नावाने सुरू करण्यात आला. आता हाच रत्नागिरी गॅस वीज निर्मितीचा प्रकल्प हा केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
Mar 12, 2013, 03:03 PM ISTराज्याला केंद्राकडून मिळेल मदत - मुख्यमंत्री
दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आलय. यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक दिल्लीत पार पडली.
Aug 25, 2012, 11:54 AM ISTमी देशद्रोही.. तर तुरुंगात टाका - अण्णा
टीम अण्णाच्या आंदोलनामागे परदेशी शक्ती असल्याच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आरोपाला आज अण्णांनी उत्तर दिलय. आंदोलनामागे परदेशी शक्ती असतील, तर त्याचे पुरावे द्या, असा पलटवार अण्णांनी केलाय. आपण जर देशद्रोही आहे, असं सरकारला वाटतं असेल, तर सरकारने तुरुंगात टाकावे असं आव्हान अण्णांनी दिले आहे.
Jun 12, 2012, 10:19 PM ISTपंतप्रधानांवर नरेंद्र मोदींची टीका
पंतप्रधान आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत, गुजरातमध्ये येत्या विधानसभा निवडणुकांत विजयाचा विश्वास, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राजकोटमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत बोलताना त्यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.
Jun 10, 2012, 06:28 PM ISTकाळ्या धनाचे आकडे गायब; श्वेतपत्रिका जाहीर
श्वेतपत्रिकेत सरकार काळ्या पैशाचा आकडा जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारनं महत्त्वाच्या मुद्यालाच बगल देत श्वेतपत्रिका जाहीर केलीय.
May 21, 2012, 02:37 PM ISTदुष्काळासाठी राज्याचं केंद्राला साकडं!
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्राकडं 2 हजार 281 कोटी 37 लाख रुपय़ांच्या पॅकेजची मागणी केलीये. या पॅकेजचं स्वरुप काय असणार आहे.
May 7, 2012, 04:23 PM IST