मतदार राजा जागा हो!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:23 PM ISTनिवडणूक आयोग आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार?
गणपती बाप्पा आपल्या गावी जाण्याच्या तयारीत असतांना, निवडणूक आयोग आज महाराष्ट्र विधानसभेसाठी रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. कारण निवडणूक आयोगाने उद्या नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
Sep 8, 2014, 07:50 PM ISTपेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना दणका
पेड न्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना निव़डणूक आयोगाने दणका दिलाय.
Jul 13, 2014, 06:49 PM ISTराष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!
राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.
Jun 30, 2014, 02:09 PM ISTयंदाची निवडणूक सर्वात महागडी, ३३४२६ कोटी खर्च!
लोकसभा निवडणूक म्हणजे कोट्यवधींची उधळण हे पुन्हा दिसून आलंय. यंदाची निवडणूक तर सर्वांत महागडी ठरली आहे. निवडणुकीसाठी सरकारनं ३४२६ कोटी रुपये खर्च केले, तर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून ३० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं एकत्रित ३३,४२६ कोटी रुपयांचा चुराडा या निवडणुकीत झाला आहे.
May 14, 2014, 10:07 AM ISTराहुल गांधींना निवडणूक आयोगाची क्लिन चिट
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना निवडणूक आयोगाने क्लिन चिट दिलीय. अमेठीमध्ये 7 मे रोजी मतदानाच्या वेळी राहुल गांधींनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या भागात प्रवेश करून, मतदान गोपनीयतेचा भंग केल्याची तक्रार भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली होती.
May 10, 2014, 08:07 PM ISTराहुल गांधी हाजीर होऽऽ! बूथ कॅप्चरिंग भोवलं!
अमेठीतील मतदान केंद्रामध्ये केलेली घुसखोरी आणि हिमाचल प्रदेशात १ मे रोजी केलेलं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना चांगलंच भोवलंय.
May 10, 2014, 11:48 AM IST‘बुथ कॅप्चरिंग’ प्रकरणी राहुल गांधींवर आज निर्णय
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.
May 9, 2014, 10:56 AM IST`राजकारणी आणि पक्षाला निवडणूक आयोग घाबरत नाही`
मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक आयोगावर झालेल्या टीकेवर मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.
May 8, 2014, 05:26 PM ISTबीएचयू बाहेरील भाजपचा ‘सत्याग्रह’ संपला
भाजप नेते अमित शाह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वात वाराणसीमध्ये सुरू असलेला भाजप कार्यकर्त्यांचा सत्याग्रह संपलाय. बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीच्या बाहेर भाजपचे नेते आंदोलन करत होते. नरेंद्र मोदींच्या रॅलीसाठी निवडणूक आयोगानं नकार दिल्यानं भाजपचं हे आंदोलन सुरू होतं.
May 8, 2014, 03:48 PM ISTवाराणसीत निवडणूक आयोगाविरोधात भाजपचा ‘सत्याग्रह’ सुरू
वाराणसीतल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये धरणं आंदोलन करतायत. तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर न्यायमार्च काढण्यात आलाय.
May 8, 2014, 01:28 PM ISTआरती शक्य नाही, गंगा माते माफ कर - नरेंद्र मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वाराणसीत जात आहेत. मात्र, मोदी तिथून बारा किमी दूर असलेल्या जगतपूरमध्ये सभा घेणार आहेत.
May 8, 2014, 09:43 AM ISTनरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी
आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.
May 5, 2014, 10:20 PM ISTमोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत कमळ हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.
Apr 30, 2014, 02:33 PM IST`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार
कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.
Apr 30, 2014, 12:01 PM IST