पंतप्रधान नरेंद्र मोदी

'मेक इन इंडिया' प्रत्येक भारतीयाची जबाबदारी - पंतप्रधान

 'मेक इन इंडिया' ही केवळ एक घोषणा नसून, ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. ही जाणीव प्रत्येकाकडे असली पाहिजे.  एफडीआय म्हणजे केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नसून, प्रत्येक भारतीयासाठी 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' ही जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Sep 25, 2014, 02:12 PM IST

अमेरिकेत जाणार पण, ओबामांसोबत जेवणार नाही पंतप्रधान मोदी

व्हाइट हाऊसमध्ये प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूताकडून दिलं जाणाऱ्या रिसेप्शनचा मेन्यू तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर काही खाणार नाहीयेत. पाच दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचा उपवास करणार आहे. याबद्दलची एक बातमी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय. 

Sep 22, 2014, 11:15 AM IST

विधानसभा निवडणुकीत कांदा राजकारण्यांना रडवणार

जसजशा विधानसभा जवळ येतायत. तसंतसं कांद्याचं राजकारण अधिकच रंगू लागलंय. कांद्याचंच नव्हे तर डाळिंबाचेही भाव घसरल्यानं शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहे. याचा फटका बसणार हे लक्षात आल्यानं महायुतीचे साथीदार असलेली स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अखेर प्रश्न सत्तेचा आणि मुद्दे तापत ठेवण्याचा आहे. 

Sep 10, 2014, 04:50 PM IST

ऊठसूठ आंदोलनं करू नका, उद्धव ठाकरेंनी दिल्या कानपिचक्या!

केंद्रात मोठ्या कष्टानं आपलं सरकार आलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा. परंतु पहिल्या दिवसापासून आंदोलन करून वातावरण बिघडवू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कानपिचक्या दिल्या. 

Sep 10, 2014, 10:51 AM IST

शतकवीर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावर धूम

 2014. सत्तेमध्ये परिवर्तन. अनेक वर्षांच्या काँग्रेस राजवटीला 'दे धक्का' दिला. प्रथमच सत्तेत भाजप अर्थात एनडीएचे सरकार केंद्रात विराजमान झाले. याचे श्रेय जाते ते नरेंद्र मोदी यांना. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आले. याच सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. मोदी फिव्हर सोशल मीडियातही पाहायला मिळत आहे.

Sep 2, 2014, 11:38 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर उड्डाण रोखले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नागपूर विमानतळावर आगमन झालं खरं मात्र त्यांच्यासोतच पावसाचंही जोरदार आगमन झालं. त्यामुळं मोदी नागपूर विमानतळावर थांबून आहेत. एटीसीनं त्यांच्या हेलिकॉप्टरला उडण्याची परवानगी नाकारली आहे. 

Aug 21, 2014, 05:29 PM IST

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नागपूर मेट्रोच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: याबाबतची भूमिका जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रम होणार आहे.

Aug 20, 2014, 11:34 PM IST

पंतप्रधान कार्यक्रम उपस्थितीसाठी केवळ प्रोटोकॉल पाळा - काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदीबरोबरच्या उदघाटन कार्यक्रमांना काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल म्हणून उपस्थित राहावे. मात्र त्यानंतर राजकीय रॅलीला जाऊ नये,अशी सूचना काँग्रेसने आपल्या पक्षातील मुख्यमंत्र्यांना दिलीय. पुणे असो की नागपूर, मेट्रो प्रकल्पाचं श्रेय्य काँग्रेस सरकारचंच आहे. मोदी सरकार हे श्रेय्य लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लगावलाय.

Aug 20, 2014, 05:34 PM IST

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी देणार न लिहिलेलं भाषण!

ऐतिहासिक लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 68व्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला संबोधित करतील. मोदींचं हे भाषणही यावेळी ऐतिहासिक असणार आहे. 

Aug 14, 2014, 10:35 PM IST

कॉमनवेल्थ स्पर्धा : मोदींनी दिल्यात ट्विटरवरून शुभेच्छा

ग्लास्गो येथे सुरू होणा-या कॉमनवेल्थ गेम्सकरता भारतीय अॅथलिट्स सज्ज झाले आहेत. दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भारतीय अॅथलिट्ससमोर असणार आहे. स्पर्धेदरम्यान भारतीय अॅथलिट्सचं मनोबल उंचावण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Jul 23, 2014, 04:01 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी मिशेल ओबामाचं क्विक लंच!

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे अनेक विदेश दौरे ठरले आहेत. त्यामधलाच एक महत्वाचा दौरा म्हणजे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा. या आधीच्या पंतप्रधानांसाठी अमेरिका दौर्‍यात राजकीय भोजनाचं आयोजन असायचं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ओबामांची पत्नी मिशेल ओबामा यांनी राजकीय भोजनाऐवजी 'क्विक लंच'चं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Jul 21, 2014, 09:38 PM IST