पाऊस

ठाण्यात ५ जण बुडालेत, पुढील ४८ तासात अतिवृष्टी

गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून आज मुसळधार पावसाने ठाणे शहर परिसराला झोडपले. शहरातील स्टेशन परिसरातील नाल्यात तीन जण बुडालेत तर वागळे इस्टेटमध्ये दोघे बुडालेत. यापैकी एकाचा मृतदेह सापडला. चार जण अद्याप बेपत्ता आहेत.

Aug 29, 2017, 11:02 PM IST

पावसात अडकलेल्यांना मुंबईकरांचा मदतीचा हात, तुम्ही येथे थांबा!

चार तासात अतिवृष्टी झाली आणि मुंबईची दैना उडाली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. तसेच रेल्वे सेवा पावसामुळे ठप्प पडली आहे. त्यामुळे दळणवळाची साधन नसल्याने अनेक जणांना घरी जाता आलेले नाही. अशा पावसात अडकलेल्या लोकांना मुंबईकरांनी मदतीचा हात पुढे केलाय.

Aug 29, 2017, 08:42 PM IST

पुणे, नाशिकमधील वाहनांना मुंबईत नो एन्ट्री

पुणे, नाशिकमधून येणारी वाहनांना मुंबईत नो एन्ट्री, पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडालाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आलेय.

Aug 29, 2017, 07:24 PM IST

पावसामुळे मुंबईतील शाळा, कॉलेजला उद्या सुटी जाहीर

जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. पाऊस न थांबल्याने पाणी साचल्याने वाहतूक सेवा ठप्प आहे. अनेक मार्गावर गाड्या खोळंबल्या आहेत. तसेच तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प आहे. त्यामुळे अनेक जण अडकलेत. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून उद्या शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Aug 29, 2017, 06:59 PM IST

मुंबईकरांचे हाल : पावसामुळे वाहतूक सेवा ठप्प, अनेक जण अडकलेत

 मुसळधार पावसामुळ मुंबईकरांचे हाल, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, घरी  जाणाऱ्यांचे हाल झालेत. कोणतेही वाहन नसल्याने घरी कसे पोहोयचे असा प्रश्न त्यांना सतावतोय.

Aug 29, 2017, 06:41 PM IST