पाऊस

मुंबई जलमय : मदत न करता मदत केलेल्या दाव्याची अशी पोलखोल

 २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीने अनेकांची त्रेधातिरपट केली. जलमय मुंबईत अनेकांना रात्र उपाशीपोटी काढावी लागली. कारण घरी जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. मात्र, संकटात सापडलेल्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र, मदत न करता आपण कशी मदत केली याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aug 31, 2017, 04:25 PM IST

मध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!

मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला. 

Aug 31, 2017, 01:13 PM IST

पावसानंतर मुंबईत आता रोगराई,आजाराची भीती

मंगळवारी झालेल्या तुफान पावसानंतर आता मुंबईत रोगराई आणि आजार पसरण्याची भीती निर्माण झालीय. या पावसामुळे आरोग्यविषयक प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे. 

Aug 31, 2017, 09:01 AM IST

कल्याणमध्ये गोडाऊनची भिंत कोसळली, ४ जण ढिगाऱ्याखाली

गोडाऊनची भिंत अंगावर पडून ४ जण खाली दबल्याची घटना कल्याण पूर्वेच्या चक्की नका भागात घडलीय. चक्की नाका इथली एका बंद गोडाऊनची भिंत कोसळण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. 

Aug 31, 2017, 08:30 AM IST

VIDEO : कागदाच्या होड्यांसारख्या उलटल्या या गाड्या!

बोरीवलीतल्या शांतीवन परिसरातल्या रहिवासी सोसायट्यांमधल्या गाड्या कालच्या पावसात खेळण्यासारख्या वाहून गेल्या.

Aug 30, 2017, 09:49 PM IST

...म्हणून मुंबई सुरळीत झाली - उद्धव ठाकरे

...म्हणून मुंबई सुरळीत झाली - उद्धव ठाकरे

Aug 30, 2017, 06:07 PM IST

मुंबापूरीची तुंबापुरी: अभ्यासक, दिग्गजांनी राजकारण्यांना झोडपले

मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यावर चर्चा झाली नाही तरच नवल. पाऊस सुरू असताना काल (मंगळवार) समाधी अवस्थेत गेलेल्या राजकारण्यांनी आज (बुधवार)  एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरू केली आहे. या सर्वात शहर व्यवस्थापनाचे मात्र तिन तेरा वाजले. दरम्यान, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मात्र अभ्यासू मते व्यक्त केली आसून, राजकाण्यांना चांगलेच झोडपले आहे.

Aug 30, 2017, 05:56 PM IST

'...म्हणून मुंबई सुरळीत झाली'

मुंबईत कालच्या पावसामुळं महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झालाय. 

Aug 30, 2017, 05:20 PM IST

अलर्ट: पुढच्या दोन दिवसात पाऊस धक्कातंत्राच्या तयारीत!

राज्यभरात सुरू असलेला पावसाचा कहर पुढचे आणखी दोन दिवस चालणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवतानाच नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Aug 30, 2017, 05:10 PM IST

पावसाच्या पाण्यात अडकलेल्या गाडीत गुदमरून वकिलाचा मृत्यू

सायनमध्ये गांधी मार्केटसमोर पावसाच्या पाण्यात अडकलेल्या गाडीत गुदमरून वकिलाचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. 

Aug 30, 2017, 04:41 PM IST

मुंबईकरांच्या हालअपेष्टांना ढिसाळ रेल्वे प्रशासनही जबाबदार

मंगळवारी झालेल्या पावसात मुंबईची तुंबई झाली आणि मुंबईची जीवनवाहिनी तातडीने ठप्प झाली. रेल्वे ठप्प झाल्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड असे हाल झाले. यात सगळ्यात दिसून आली रेल्वेची बेपर्वाई, प्रशासनाची मस्ती आणि तरीही मुंबईकरांची प्रचंड सहनशीलता...

Aug 30, 2017, 04:24 PM IST