मुंबई : मंगळवारी झालेल्या तुफान पावसानंतर आता मुंबईत रोगराई आणि आजार पसरण्याची भीती निर्माण झालीय. या पावसामुळे आरोग्यविषयक प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे.
पावसानं पाईपलाईनमध्ये लिकेज होऊन पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी उकळून प्या, असे आवाहन मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी केले आहे.
मंगळवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. दूषित पाण्यामुळे खोकला, ताप, अंगदुखी, कणकण आणि त्वचेचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच संसर्गजन्य आजाराची साथ पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात येतेय. कोणतंही दुखणं किंवा आजार अंगावर काढू नका, असं आवाहनही करण्यात येत आहे.