पाऊस

पावसाच्या हजेरीने नागपूरकर सुखावले

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागपूरकर चांगलेच हैराण झाले होते. अचानक पावसाला सुरवात झाली आणि बघता-बघता मुसळधार सरींनी शहराला चिंब भिजवले. 

Sep 9, 2017, 07:10 PM IST

सप्टेंबर महिन्यातही हलका-मध्यम पाऊस पडणार

राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तवलीये.

Sep 6, 2017, 05:05 PM IST

मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा कायम

बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा मराठवाड्यात दडी मारली आहे. खरंतर गणेश उत्सवापूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली त्यामुळं सरासरी गाठेल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली अजूनही मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी 779 मिमी इतकी आहे. मात्र आतापर्यंत फक्त 456 मिमी इतका पाऊस झाला आहे. 58.65 टक्के इतकाच पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

Sep 6, 2017, 04:29 PM IST

शहापूर तालुक्यातल्या ५० गावांचा संपर्क तुटला

शहापूर तालुक्यात सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातसई गावाजवळील पूल खचलाय. त्यामुळे प्रशासनाने हा पूल दळणवळणासाठी बंद केलाय. त्यामुळे आता वासिंद परिसरतील ५० गावांचा संपर्क तुटला आहे.

Sep 1, 2017, 04:26 PM IST

मुंबईला हवेय आणखी डॉप्लर रडार

शहर आणि परिसरमध्ये २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसादरम्यान डॉप्लर रडारची चांगली मदत झाल्याचा दावा मुंबई हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केलाय. त्यामुळे भविष्याचा विचार करता आणखी डॉप्लर रडारची मागणी केलेय.

Sep 1, 2017, 02:26 PM IST