वेळ रात्री ११.०० वाजता; ... आणि सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये?
मांजर डोळे मिटून दूध पिते... कारण, डोळे मिटल्यावर आपल्याला कोणी बघणार नाही असा तिचा बापडीचा समज असतो. धुळे महापालिकेतही सध्या असाच काहीसा प्रकार सुरु आहे.
Dec 5, 2013, 02:55 PM IST‘तो’ कुत्रा नेमका कोणता?
चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा प्रत्यय सध्या पिंपरी-चिंचवडमधल्या कुत्र्यांना आलाय...
Dec 2, 2013, 10:25 PM ISTसोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात ‘मगर’!
सोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण तिथं वावर आहे मगरीचा...
सोलापूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. उद्यान विभागाच्या वन्य प्राणी विभागातून दोन वर्षांपूर्वी मगरीची पिल्ले बाहेर गेल्याची माहितीच पालिकेच्या उद्यान विभागाला नाही. नागरिकांचा वावर असलेल्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या मगरीला तब्बल अडीच वर्ष झाली तरीही उद्यान विभागाला याचा पत्ताच लागलेला नाही.
आयुक्तांविरोधात मनसेची अविश्वास प्रस्तावाची सूचना
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात मनसेनं अविश्वास प्रस्तावाची सूचना दिलीये.
मनसेचे नवनियुक्त गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौर सुनिल प्रभू यांना याबाबत पत्र पाठवलंय.
धरणं भरलेली; तरीही पुण्याला एकवेळ पाणी…
पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीही पुणेकरांना एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.
Oct 15, 2013, 08:37 PM ISTनाशिकच्या महापौर, आयुक्तांची खूर्ची जप्त!
नाशिकचे महापौर आणि आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी महापालिकेत पोहोचलेत. खुर्ची जप्त करण्याची मुदत वाढवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झालीय.
Oct 14, 2013, 06:59 PM ISTमहापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर!
इच्छाशक्तीच्या बळावर मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलाय. चतुर्थश्रेणी कर्मचारी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील विद्यापिठात अभ्यासाठी जात असल्याची ही पहिली वेळ आहे. पण मुंबई महापालिकेला त्याचं फारसं अप्रूप नसल्याचं दिसतंय.
Oct 6, 2013, 08:57 PM ISTविघ्नहर्त्याच्या आगमनाआधी मंडळांवर विघ्न!
गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना यंदा महापालिकेच्या अजब कारभाराचा फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसलाय.
Aug 22, 2013, 12:00 PM IST‘राजा’च्या मंडपाला महापालिकेची परवानगी
गेल्या वर्षीचे खड्डे न बुजविल्यामुळं आधी मागील वर्षीचा १९ लाखांचा दंड भरा, तेव्हाच मंडपासाठी परवानगी देऊ असा पवित्रा महापालिकेनं घेतला होता. मात्र दंडाची रक्कम प्रॉपर्टी टॅक्समधून वसूल केली जाईल, अशी भूमिका घेत आता मंडपासाठीची परवानगी महापालिकेनं दिलीय.
Aug 7, 2013, 09:47 AM ISTमनसे नगरसेवकाची दादागिरी
फोन उचलत नसल्याच्या रागानं मनसेचे स्वीकृत नगरसेवक गिरीश धानुरकर यांनी मुंबई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेश राठोड यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली. पहिले रस्त्यावर आणि नंतर जबरदस्तीनं शाखेत नेऊन राठोड यांना धानुरकरांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं.
Aug 2, 2013, 01:33 PM ISTअमेरिकेतील संपूर्ण डेट्रॉईट शहर दिवळखोरीत!
सर्वशक्तिमान महासत्ता असं बिरुद मिरवणा-या अमेरिकेवर एका प्रमुख शहराची पालिका दिवाळखोरीत काढण्याची नामुष्की ओढवली आहे. अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातील डेट्रॉईट या शहरावर ही आपत्ती ओढवली आहे.
Jul 20, 2013, 09:23 PM ISTमहापौर सेनेचा, नगरसेवक सेनेचा तरी राडा!
शिवसेनेच्या नगरसेवक आणि सभागृह नेत्यांनी शिवसेनेच्याच महापौरांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना ठाणे महापालिकेत घडली.
Jul 16, 2013, 08:01 PM ISTएव्हरेस्ट सर करणारे बहाद्दर मनपाच्या विस्मृतीत
ज्या सागरमाथा वीरांनी पिंपरी चिंचवडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठं केलयं त्या विरांच्या इच्छेला नव्या अपेक्षा देऊन नुस्ती टांगणी लावण्याचं काम महापालिका करत आहे.
Oct 12, 2012, 01:31 PM ISTअरेरे... पुणे महापालिकाने बूटही सोडले नाहीत
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे जोडे कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. होय, यावर्षीच्या बूट खरेदीमध्ये लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे.
Sep 8, 2012, 07:52 PM ISTआता, कागदी नाही ‘ई-फाईल’शोधा!
मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे महाराष्ट्र सरकारची लाजच काढली. या आगीत अनेक कागदी फाईली जळून भस्मसात झाल्या. या घटनेतून धडा घेत आता राज्यातील सर्व महापालिका, महामंडळं आणि प्राधिकरणांना‘पेपरलेस’होत आहेत.
Aug 17, 2012, 08:10 AM IST