www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण तिथं वावर आहे मगरीचा...
सोलापूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. उद्यान विभागाच्या वन्य प्राणी विभागातून दोन वर्षांपूर्वी मगरीची पिल्ले बाहेर गेल्याची माहितीच पालिकेच्या उद्यान विभागाला नाही. नागरिकांचा वावर असलेल्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या मगरीला तब्बल अडीच वर्ष झाली तरीही उद्यान विभागाला याचा पत्ताच लागलेला नाही.
सोलापूर शहराच्या रेवण सिद्धेश्वर भागात महानगरपालिकेचे महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय आहे. आता या मगरीला पकडण्यासाठी वन विभागानं कंबर कसलीय. मात्र या मगरीच्या वावरानं या भागात राहणाऱ्या लोकांची चांगलीच घाबरगुंडी उडालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ