मुंबई । मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळाला तडा
मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली. या मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी अप गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचे प्रवाशांचे हाल होत आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले तरी वाहतूक उशिरानेच सुरू राहणार आहे. सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा ताण जलद लोकलवर पडला आहे.
May 13, 2019, 12:10 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळाला तडा
मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली.
May 13, 2019, 10:01 AM ISTमुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत
आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे तसंच हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे ऑफिसमधून घरी परतण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सीएसटी स्टेशनवर हजारो प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
Nov 7, 2012, 07:57 PM ISTमध्यरेल्वेची वाहतूक अजूनही उशिरानेच
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं विस्कळीत झालेली मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय. सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र तत्पूर्वी सकाळच्या सुमारास झालेल्या सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळं प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले.
Apr 4, 2012, 11:44 AM IST