मृत्यू

दहीहंडीः राज्यात दोघा गोविंदांनी प्राण गमावले

ठाणेः गोविंदा पथकात नाचत असताना चक्कर येऊन पडलेल्या एका गोविंदाचा ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. लालबागच्या साईसदन गोविंदा पथकातील राजेंद्र आंबेकर असे या गोविंदाचे नाव असून  त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर रत्नागिरीत दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाला. ननाटे येथील बबन उमासरे यांचा दहीहंडी फोडताना मृत्यू झाला. 

Aug 18, 2014, 05:58 PM IST

जास्त मीठ खाऊन दर वर्षी मरतात लाखो

हो हे खरं आहे, मीठ तुमचे प्राणही घेऊ शकते. जगभरात गेल्या वर्षभरात सुमारे साडे सोळा लाख लोकांनी अधिक मीठ खाण्याने आपले प्राण गमावले आहे. एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे. इंग्लडच्या न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या नुसार जगात सर्वाधिक मीठ हे भारतीय खातात.

Aug 16, 2014, 05:49 PM IST

हास्य अभिनेते रॉबिन विल्यम्स यांचं मृत शरीर आढळलं

जेष्ठ हॉलीवूड अभिनेते, कॉमेडियन आणि ऑस्कर विजेते रॉबिन विल्यम्स काळाच्या पडद्याआड गेलेत. वयाच्या 63 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Aug 12, 2014, 09:17 AM IST

आणखी एका 19 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

नवी मुंबईत दहिहंडी सरावादरम्यान बालगोविंदाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता 24 तास उलटलेत. यानंतर मुंबईतील जोगेश्वरी पश्चिममध्ये एका एकोणीस वर्षाच्या गोविंदाचा मृत्यू झालाय. 

Aug 10, 2014, 11:23 PM IST

इराणमध्ये विमान कोसळून चाळीसहून अधिक प्रवासी ठार

विमान अपघातांची मालिका सुरुच असून आज सकाळी इराणमधील तेहरान इथं प्रवासी विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवासी अशा सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Aug 10, 2014, 02:29 PM IST

नवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यात छोट्या गोविंदाचा मृत्यू

दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर आला असतांनाच एका छोट्या गोविंदाचा जीव गेलाय. गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. शिवाय आता 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी ही घातली गेलीय. मात्र सानपाडा इथं सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

Aug 9, 2014, 02:03 PM IST

स्मिताताईंच्या आठवणीत... - डॉ. उदय निरगुडकर

स्मिताताईंच्या आठवणीत... - डॉ. उदय निरगुडकर

Aug 6, 2014, 10:24 AM IST

माळीणमध्ये दरड हटवताना 'त्यांच्या' लग्नाचा सापडला बस्ता

एक अत्यंत हृदयद्रावक अशी बातमी. माळीण दुर्घटनेनंतर गेल्या सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे. तिथं ढिगा-याखालून आतापर्यंत 129 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. पण एनडीआरएफ जवानांच्या हाती जे साहित्य सापडलं, ते पाहून काळजाला चटका लागला.

Aug 5, 2014, 11:16 AM IST

माळीण दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळेच- भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

माळीण गावातील दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळं झाली असल्याची माहिती भू-वैज्ञानिक सर्वेक्षणचे महासंचालक हर्भनसिंग यांनी दिलीय. तीव्र उतार, दमदार पाऊस आणि भू-रचनेमुळं ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय. 

Aug 3, 2014, 08:18 PM IST

माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 104, बचावकार्य सुरुच

माळीणमध्ये मृतांचा आकडा 104 वर पोहचलाय. माळीणमध्ये अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पाऊस आणि चिखलानंतर आता इथं बचावकार्यात दुर्गंधीचा व्यत्यय येतोय.

Aug 3, 2014, 07:45 PM IST

तैवानमध्ये गॅसपाईपलाईनच्या स्फोटात 24 ठारस 270 जखमी

 तैवानमध्ये गॅसपाईपलाईनमध्ये अनेक स्फोट झालेत. या स्फोटात २४ जण ठार तर २७० जण जखमी झालेत. गॅसगळती झाल्यामुळं हे स्फोट झाल्याचं सांगण्यात येतयं. या स्फोटाची तीव्रता एखाद्या भुकंपाएवढी भीषण होती. त्यात अनेक रस्ते खचले आणि गाडयांची मोडतोड झाली. रस्तांवर असलेले लोक या स्फोटाचे बळी ठरले.

Aug 1, 2014, 05:37 PM IST