'आम्ही सारे पानसरे...' एक ठिणगी पेटलेली!
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत निधन झालं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्ष पूर्ण होत असतानाच, मारेक-यांच्या गोळीनं पानसरेंचाही बळी जावा, हा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल.
Feb 21, 2015, 08:09 PM ISTझुंज संपली; गोविंद पानसरे यांचं मुंबईत उपचारादरम्यान निधन
अखेर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन झालंय. मुंबईत उचारादरम्यान ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये पानसरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
Feb 21, 2015, 12:14 AM ISTसावधान! मुंबईसह महाराष्ट्रभर स्वाईन फ्लू बळावतोय
मुंबईत स्वाईन फ्लूमुळे गेल्या १५ दिवसांत ४ जणांचा बळी गेलाय. मुंबईत १९ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईच्या १० रहिवाशांचा समावेश असून बाहेरून उपचार घेण्यासाठी १३ रुग्ण आलेले आहेत. बाहेरून आलेल्या १३ रुग्णांपैकी ४ जणांचा मृत्यू झालाय. तर पाच जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.
Feb 6, 2015, 12:48 PM ISTस्वाईन फ्लूमुळे 'कृष्णकुमारी'चा मृत्यू
स्वाईन फ्लूमुळे 'कृष्णकुमारी'चा मृत्यू
Feb 6, 2015, 12:05 PM ISTसावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण, राज्यात 22 जणांचा बळी
स्वाइन फ्लूनं मुंबईत शिरकाव केला असून फेब्रुवारी महिन्यात या तापाचे चार रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर चौथा रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतोय. राज्यात आतापर्यंत 22 रुग्णांचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.
Feb 5, 2015, 10:28 AM ISTमहिला पोलीस प्रशिक्षणार्थीचा ससून रुग्णालयात मृत्यू
खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अविक्षा नरेश डोंगरे या प्रशिक्षणार्थीचा ससुन रुग्णालयात मृत्यू झालाय.
Jan 24, 2015, 10:57 PM IST'थरुर-मेहर तरार यांनी दुबईत तीन रात्री एकत्र घालवल्या'
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं प्रकरण दिवसेंदिवस वेगळं वळण घेताना दिसतंय. सोमवारी, मीडियामध्ये आलेल्या काही दाव्यांनुसार, काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिच्यासोबत दुबईमध्ये थांबले होते.
Jan 13, 2015, 09:31 AM IST'सुनंदाच्या मृतदेहावरील १५ जखमा मारहाणीच्या'
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी वेगवेगळे खुलासे सध्या बाहेर पडतायत. सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणी एम्सचा अंतिम मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असल्याचं म्हटलं गेलंय. इतकंच नाही तर, त्यांनी हे स्वत:हून घेतलं असावं किंवा इंजेक्शनच्या साहाय्याने यांच्या शरीरात पोहचवलं गेल्याची शंका व्यक्त केलीय.
Jan 9, 2015, 11:08 AM ISTएसआयटी करणार सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणाचा तपास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:54 PM ISTसुनंदा मृत्यू प्रकरण : FIR बाबत काँग्रेसचं आश्चर्य
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेस भाजपमध्ये आरोप - प्रत्त्यारोपाचं राजकारण सुरु झालंय. मृत्यूनंतर एका वर्षानं पोलिसांनी F I R दाखल केल्याबद्दल, काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय.
Jan 6, 2015, 06:52 PM ISTयात्रेत हत्ती उधळला... चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू
सातारा पाली यात्रेच्या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आलीय. हत्ती बिथरल्याने यात्रेत गोंधळ उडाला आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले.
Jan 3, 2015, 08:33 PM ISTयात्रेत हत्ती उधळला... चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू
यात्रेत हत्ती उधळला... चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू
Jan 3, 2015, 07:40 PM ISTकोल्हापुरात घुसलेला बिबट्याचा अखेर मृत्यू
कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. सकाळी 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं. पण बिबट्याला जंगलात सोडायला जात असताना बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला.
Jan 1, 2015, 07:35 PM ISTधक्कादायक: २ वर्षाच्या मुलाच्या हातून बंदूक चालली, आईचा मृत्यू
हेडनच्या एका वॉलमार्टच्या शॉपमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या आई-मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या २ वर्षाच्या मुलानं आईच्या पर्समधून बंदुक काढली आणि चुकून ट्रिगर दबल्या गेलं. गोळी त्याच्या आईलाच लागली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात खळबळ माजलीय.
Dec 31, 2014, 01:53 PM IST