सांगली

‘ज्यांना शिवसेनेत यायचंय, त्यांनी लवकरात लवकर यावं’ - उद्धव

 

सांगली: ज्यांना शिवसेनेत यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर यावं, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपुरात दिलाय. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

नुकताच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. 

Jul 13, 2014, 03:09 PM IST

'सख्खे' शेजारी असे बनतात 'पक्के' वैरी!

तुमच्या घरातून बाहेर पडण्याचा मार्गच कुणी बंद करून टाकला तर...? नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा उभा राहतो. पण सांगलीतल्या एका कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्यांनीच ही आफत आणलीय. दुर्दैव म्हणजं आपल्या सुटकेसाठी हे कुटुंब टाहो फोडतंय. पण गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या जिल्ह्यातच पोलीस खातं आणि पालिका प्रशासन ढिम्म बसून आहे.

Jul 9, 2014, 08:53 PM IST

राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात मोठा धक्का, अजितराव घोरपडे भाजपात

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय़. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि विजयानंतर आता अजित घोरपड्यांच्या भाजप प्रवेशामुळं सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. 

Jul 7, 2014, 09:33 PM IST

विधानसभेच्या तोंडावर सांगलीत राष्ट्रवादीला हादरा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसलाय. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. 

Jul 7, 2014, 10:34 AM IST

जेवणाचे पैसे मागितले म्हणून चौघांवर अॅसिड हल्ला

सांगलीत चौघांवर अॅसिडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात चारही जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सांगलीच्या सिव्हिल हॉ़स्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सांगलीच्या गुरुप्रसाद ढाब्यावर ही घटना घडली

May 11, 2014, 04:16 PM IST

सांगलीत गॅस सिलिंडर स्फोटात 6 ठार, 1 जखमी

सांगली शहरातल्या वारणाली भागात गॅस सिलिंडरचा स्फोट झालाय. या दुर्घटनेत चव्हाण कुटुंबातले सहा जण ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झालाय. दोन जखमींना बाहेर काढण्यात यश आलं.

May 3, 2014, 11:47 AM IST

तब्बल १३ वर्षानंतर आज मोदी सांगलीत

भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बडोद्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.

Apr 9, 2014, 12:27 PM IST

ऑडिट मतदारसंघाचं : सांगली

ऑडिट मतदारसंघाचं : सांगली

Apr 4, 2014, 05:02 PM IST

गारपिटीचा धोका टळणार, गारांचे रूपांतर पाण्यात शक्य..

राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. गारपिटीला भविष्यात तोंड देता येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, ते आता शक्य आहे. गारांचे रूपांतर पाण्याच्या थेंबात करता येऊ शकणार आहे. तसे संशोधन विकसित करण्यात आले आहे.

Mar 18, 2014, 02:05 PM IST