सोनियांवर टीका करणाऱ्यांवर राणे संतापले
सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...
Jul 5, 2013, 04:59 PM IST‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
Jul 4, 2013, 02:34 PM ISTभाचीचा बलात्कारनंतर खून, मामाला फाशी
भाचीचा बलात्कार करून खून करणा-या मामाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीय. सदाशिव कांबळे असं या आरोपीचं नाव असून सदाशिवला सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय. आरोपी सदाशिवला खून प्रकरणी फाशी आणि बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Mar 26, 2013, 06:26 PM ISTसांगली महापौरांच्या घरावर आयकरचे छापे
राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार उवून दिला. या थाट राष्ट्रवादीच्या मंत्र्याना आणि महापौरांना चांगलाच महागात पडलाय. तर एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरलाय. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.
Feb 20, 2013, 04:21 PM ISTपवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा शाही विवाह
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा पश्चिम महाराष्ट्रात थाटात झाला. विवाहाचे महाभोजन देण्यात आले. दुष्काळात वऱ्हाडीमंडळींनी चांगलाच मटनावर ताव मारला.
Feb 18, 2013, 01:47 PM ISTमंत्र्याचे दुष्काळी दौरे भंपकपणा - राज ठाकरे
मंत्र्यांनी दुष्काळ भागात दौरे काढून काय साधले आहे. ना दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाना ना आधार. राजकीय नेते आणि मंत्र्यांनी केलेले दुष्काळी दौरे हे भंपकपणा आहे, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
Feb 11, 2013, 02:34 PM ISTराज ठाकरे आज सांगलीत संवाद साधणार
महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सांगलीतल्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे कालच सांगलीत दाखल झालेत.
Feb 11, 2013, 01:09 PM ISTऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी
उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.
Nov 22, 2012, 10:07 AM ISTऊसाला २५०० रूपये भाव
सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केला असून, उसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.
Nov 19, 2012, 03:36 PM ISTआंदोलनकर्त्यांवर पुन्हा गोळीबार; एक जखमी
सांगली जिल्ह्यातील आष्टा गावात ऊस दरासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण पाटील हा तरुण जखमी झालाय.
Nov 14, 2012, 07:49 PM ISTपोलिसांच्या गोळीबाराने त्याचं स्वप्न धुळीला
काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसाला चांगला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलेल्या चंद्रकांत नलावडे या शेतक-याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. पैसा आला की घरात थोडी खरेदी करता येईल, पोरांना चार कपडे घेता येतील, असं स्वप्न रंगवणारं चंद्रकांतचं कुटुंबं पोरकं झालंय.
Nov 14, 2012, 02:09 PM ISTशेतकऱ्यावर पाच गोळ्या झाडल्या
ऊस दरवाढ आंदोलनाच्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याला तब्बल ५ गोळ्या लागल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उजव्या आणि डाव्या पायात प्रत्येकी दोन तर एक पोटात लागल्याचे डॉक्टरांनी मान्य केलं.
Nov 13, 2012, 05:27 PM ISTसांगलीत शेतकऱ्यांवर गोळीबार, दोन ठार
शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सांगलीत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Nov 12, 2012, 04:23 PM ISTदुष्काळी भागात पाण्यासाठीही लाच!
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावात टॅंकर लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या आटपाडीच्या महसूल विभागातील कारकून आणि तलाठयाला अटक करण्यात आलीय.
Aug 8, 2012, 11:24 PM ISTपोलीस असल्याचे भासवून दागिन्यांची चोरी
पोलीस असल्याचे सांगून सांगलीतल्या सराफी दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. चिंतामणनगरमधील अक्षरा ज्वेलर्समधून पोलीस असल्याचे सांगून चोरट्यांनी सात तोळ्याचे दागिने लंपास केले. मात्र एका ठिकाणी चोरी केल्यानंतर दुस-या दुकानात चोरट्यांचा डाव फसला.
Jul 15, 2012, 07:27 AM IST