आबांच्या तासगावमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
अवेळी पाऊस आणि गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत झालेली नाही. शेतीचे नुकसान आणि कर्जबारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सांगलीमधील तासगावमधील एका शेतकरी दाम्पत्याने गारपीटीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.
Mar 15, 2014, 03:36 PM IST`गारपीटग्रस्तांना मदतीपोटी पाच हजार कोटी द्या`
राज्यातल्या गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारनं केंद्राकडून पाच हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहेत. दरम्यान, गारपिटीग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्ज वसुलीस तत्काळ स्थगिती देण्यासाठी राज्यपालांनी यात लक्ष घालावं अशी मागणी केली.
Mar 14, 2014, 09:21 PM ISTमराठा, विदर्भात वादळासह गारांचा पाऊस
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांसह संत्रा, गहू, चणा सारख्या पिकांना मोठा फटका बसला बसलाय.
Mar 4, 2014, 11:19 AM ISTराष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील भाजपमध्ये
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेला दावा खरा करण्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य संजय पाटील यांना फोडण्यात मुंडे यशस्वी झालेत. पाटील हे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. पाटील हे गृहमंत्री आर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जात आहेत.
Feb 25, 2014, 02:28 PM ISTनानाची चौफेर टोलेबाजी, नेत्यांची मालमत्ता चौपट कशी होते?
सांगलीत अभिनेता नाना पाटेकर याने राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला. नेते निवडून आल्यावर त्यांची मालमत्ता चौपट होते, असल्या नेत्यांना जनतेनं जाब विचारायला हवा, असं नाना म्हणाला. त्यांनी आपल्या नाना-स्टाईलमध्ये मराठी पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.
Feb 22, 2014, 07:15 PM IST`आबा, आम्ही तोंड उघडलं तर...`
सांगलीत पुन्हा एकदा आर. आर. पाटील आणि आमदार संजय पाटील संघर्ष रंगलाय. संजय पाटील यांनी पुन्हा एकदा आर. आर. पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानं अनेकांच्या नजरा या दोघांकडे वळल्यात.
Feb 10, 2014, 08:32 PM ISTतिच्यासोबत बोलला म्हणून त्याची काढली धिंड
माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील मिरज येथे घडली आहे. शेजारच्या तरुणीबरोबर बोलत उभा राहिला म्हणून किरण मोरे या तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर किरणच्या डोक्यावरचे केस काढून त्याची धिंड काढण्यात आली.
Feb 8, 2014, 06:57 PM ISTकैद्याने चढविला न्यायासाठी वकीलीचा `काळाकोट`
जेलमधली शिक्षा म्हणजे अनंत यातना.. याच जेलच्या वातावरणात अनेक आरोपी खचून जातात तर काहीजण गुंडगिरीकडे वळतात... मात्र याला अपवाद ठरलाय एक कैदी. वकीलाचा काळा कोट अंगावर चढवलेले हे आहेत सांगलीच्या जत तालुक्यातल्या शिंगणापूर गावचे सुखदेव पांढरे.
Feb 6, 2014, 09:41 PM ISTसांगलीचा स्टंटबॉय...८ वर्षांचा रत्नजीत
काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट करणं ही काही फक्त परदेशी तरुणांची मक्तेदारी नाही. कारण आता भारतातही असे स्टंट करणारे अनेक आहेत. मात्र सांगलीतल्या चिमुकल्याला पाहिलं तर तुम्ही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. मात्र या स्टंटचं अनुकरण करून जीव धोक्यात घालू नका. कारण सांगलीच्या स्टंटबॉयला जमलं ते तुम्हाला जमेलच असं नाही.
Feb 2, 2014, 07:39 PM ISTसांगलीवाडीतला टोल रद्द... महाराष्ट्राचं काय?
सांगलीतल्या सांगलीवाडीतील टोल रद्द करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 30, 2014, 08:39 AM ISTमर्दानी खेळ लेझीमचा विक्रम, गिनीजमध्ये नोंद
`लेझीम` हा महाराष्ट्राचा मर्दानी खेळ, आणि याच क्रीडा प्रकारात सांगली शिक्षण संस्थेच्या मुलांनी आज ऐतिहासीक कामगिरी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ७ हजार ३३८ विध्यार्थिनीनी महालेझीम सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद `गिनीज बुक ऑफ वल्ड रेकोर्ड` मध्ये करण्यात आली आहे.
Jan 26, 2014, 08:32 PM ISTडॉक्टर, इंजिनिअर यांनी बोगस मजूर दाखवून पैसे लाटलेत
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.
Dec 3, 2013, 12:54 PM ISTबलात्कार करणाऱ्या नराधमाची गाढवावरून धिंड
चाकूचा धाक दाखवून इस्लामपूर मधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीये. पिडीत मुलीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपी राहुल मानेला पकडलं आणि पीडित मुलीची सुटका केली. संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल माने याची गाढवावरून धिंड काढली.
Nov 30, 2013, 03:57 PM ISTउसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.
Nov 29, 2013, 07:49 PM ISTरेल्वेखाली तीन जणांचा चिरडून मृत्यू
सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.
Nov 27, 2013, 05:48 PM IST