सांगलीमध्ये आबांची अश्वासनं
वाळूमाफियांच्या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाया सुरु केल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे. याबाबत गृहविभाग महसूल विभागाला सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय.
Mar 14, 2012, 08:50 AM ISTगृहमंत्र्यांच्या तालुक्यात माफिया राज
गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तासगाव तालुक्यात वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेला ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न या माफियांनी केला आहे. इतकच नाही तर देखरेखीवर असलेल्या होमगार्ड्सवर प्राणघातक हल्ला केला.
Mar 10, 2012, 08:37 PM ISTअफू शेतीची चौकशी - पोलीस महानिरीक्षक
सांगली जिल्ह्यातील अफू लागवडीची पोलीस चौकशी होणार आहे. कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी ही माहिती दिली.
Mar 1, 2012, 01:13 PM ISTगृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड
सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.
Feb 28, 2012, 06:27 PM ISTरुग्णाचा मृत्यू, हॉस्पीटलमध्ये गोंधळ
सांगलीच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पीटलमध्ये घुसून गोंधळ घातला. इतकच नाही तर आपला हलगर्जीपणा दडवण्यासाठी हॉस्पीटल प्रशासनाने त्या रुग्णाचा मृतदेह बेवारस दाखवला. याप्रकरणी डॉ. ललित मोहन आणि डॉ.प्राची निर्मळे या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.
Feb 24, 2012, 01:39 PM ISTसांगलीमध्ये प्रतिष्ठेची झेडपी निवडणूक
सांगली जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सांगलीत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि पंचायत समितीचे १२४ गण आहेत.
Feb 7, 2012, 01:38 PM IST'जाऊ बाई' जोरात !
सांगली जिल्ह्यातल्या येळावी गटातून दोन सख्या जावा एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. ज्येष्ट नेते विश्वास पाटील यांची मोठी सून तेजस्विनी पाटील या काँग्रेसकडून रिंगणात आहेत.
Feb 3, 2012, 10:37 PM ISTसांगलीत नाट्यसंमेलनाची सांगता
सांगलीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची सांगता झाली. संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे यांनी या संमेलनात इतिहास घडवला.
Jan 23, 2012, 12:08 PM ISTचारा-पाण्यासाठी पतंगरावांना महिलांचा घेराव!
पाणी आणी चाऱ्याच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम यांना मीरज पूर्व भागातील दुष्काळग्रस्त महिलांनी आज घेराव घातला. कदम यांची गाडी अडवून त्यांना सुमारे अर्धातास घेराव घातला.
Jan 5, 2012, 06:01 PM ISTकोंडुस्करांच्या कमुद ड्रग एजन्सीचा परवाना रद्द
बेकायदा कॅटामाईन विक्रीप्रकरणी सांगलीतल्या कोंडुस्कर यांच्या कमुद ड्रग एजन्सीचा परवाना रद्द करण्यात आलाय.
Dec 17, 2011, 09:12 AM ISTसांगलीत राष्ट्रवादीने बाजी मारली
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर आणि तासगाव नगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीनं मुसंडी मारली आहे. तर आष्टा नगरपालिकेत राष्ट्रवादीनं सर्वच्या सर्व 19 जागा काबिज केल्या आहेत.
Dec 16, 2011, 12:46 PM ISTउर्वरित नगरपालिकेसाठी आज मतदान
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या २६ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीत ७२ उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. मतदानासाठी शहरात ८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
Dec 13, 2011, 07:39 AM IST'गुन्हेगारांना निवडणूनच का देता'- अजितदादा
अजित पवारांनी आता सरकारमधील आपल्याच लोकांना चांगले टीकेचे धनी करायचे असे ठरवलेले दिसते. कारण की, आधी मुख्यमंत्र्यांना 'टार्गेट' केल्या नंतर आता त्यांनी आपला मोर्चा जयंत पाटलांकडे वळवला आहे.
Dec 10, 2011, 11:10 AM ISTराणेंच्या बैठकीत उद्योजकांचा गोंधळ
सांगलीत नारायण राणे आणि उद्योजकांच्या बैठकीत उद्योजकांनी चांगलाच गोंधळ घातला. सांगलीतल्या उद्योजकांची गा-हाणी ऐकण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे सांगलीत आले होते.
Dec 9, 2011, 06:56 AM ISTकामूद ड्रग कारखान्यावर आज पुन्हा छापा
कोंडुसकर ट्रव्हलचे मालक अभिजीत कोंडुसकरांच्या सांगलीतल्या कामूद ड्रग कारखान्यावर आज पुन्हा छापा मारण्यात आला. केटामाईनच्या उत्पादन आणि विक्रीवर सरकारने बंदी घातलीये. मात्र तरीही कामूद लिमिटेडमध्ये केटामाईनचं उत्पादन करण्यात येत होतं.
Dec 6, 2011, 08:47 AM IST