2015 bihar assembly elections

बिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.

Nov 1, 2015, 08:47 AM IST

बिहार विधानसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. ५० विधानसभा क्षेत्रातील सुमारे दीड कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८०८ उमेदवारांचं भवितव्य आज मतदार राजा ठरणार आहे.

Oct 28, 2015, 08:51 AM IST

बिहार निवडणूक: पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान

बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलंय. 49 जागांसाठी  583 उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालंय. पहिल्या टप्प्यात 13 हजार 212 मतदान केंद्रावर हे मतदान पार पडलं. या पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान झालयं. 

Oct 12, 2015, 10:40 PM IST

लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.

Sep 3, 2015, 01:42 PM IST

लालू प्रसाद यादव यांनी केली मोदींची मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल

 राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारच्या एका सभेत चांगली मिमिक्री केली.  बिहारला १.२५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेज दिल्याच्या घोषणेची चांगली खिल्ली उडवली. 

Aug 20, 2015, 03:21 PM IST