24taas

सोलापूरमध्ये खाजगी बसला अपघात, आठ ठार

शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातात बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Oct 7, 2014, 12:39 PM IST

मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय. 

Oct 7, 2014, 11:58 AM IST

जेटली सर्वात श्रीमंत मंत्री, मोदींची १.२६कोटींची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ १.२६ कोटीं रुपये इतकी संपत्ती आहे. तर संरक्षण आणि अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारमधील सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहे. त्यांच्याजवळ ७२.१० कोटी रुपये एकूण संपत्ती आहे. 

Oct 7, 2014, 09:51 AM IST

Pic leaked: ‘पीके’ मध्ये अनुष्का शर्माचा जर्नलिस्ट लूक!

आमिर खानचा चित्रपट पीके आपल्या पोस्टर लॉन्चनं चर्चेत आहे. चित्रपटात संजय दत्त, अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटातील आमिर आणि संजय दत्तचा लूक तर आपण पाहिला... पण आता पहिल्यांदाच अनुष्काचा लूक लॉन्च झालाय.

Oct 7, 2014, 08:18 AM IST

सीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या रणसंग्रामात उतरलेत... एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना, पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात मश्गूल असल्यानं टीकेची झोड उठलीय.

Oct 7, 2014, 07:25 AM IST

पाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी

पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.

Oct 7, 2014, 07:15 AM IST

गडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत. 

Oct 7, 2014, 07:07 AM IST

नितीन गडकरींवर पुण्यात बूट फेकण्याचा प्रयत्न

नितीन गडकरी यांच्यावर पुण्यातील कोथरुड येथील सभेत एका व्यक्तीनं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधीत व्यक्तीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून, ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे. 

Oct 7, 2014, 06:53 AM IST

भाजप विरोधासाठी राज-उद्धव एकत्र?

भाजप शिवसेनेपासून दुरावला असला तरी भाजपमुळंच ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी सुरू झाल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्तानं दिसतंय. शिवसेना आणि मनसेनं भाजपला लक्ष्य करण्याचा एककलमी अजेंडा निवडणूक प्रचारात राबवलाय. 

Oct 6, 2014, 03:52 PM IST

मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले. 

Oct 6, 2014, 03:37 PM IST

‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले

माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

Oct 6, 2014, 03:00 PM IST

इबोलानं मृत झालेला व्यक्ती जिवंत होतो तेव्हा...

लाइबेरियामध्ये डॉक्टरांनाही धक्का बसला जेव्हा इबोलानं मृत झालेला व्यक्ती पुन्हा उठून बसला. हा अजिब किस्सा घडलाय लायबेरियाची राजधानी मोनरोविओच्या हॉस्पिलटलमध्ये. 

Oct 6, 2014, 02:09 PM IST