24taas

सोशल मीडियाच्या वापरावर निवडणूक आयोगाचं लक्ष

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. राजकीय पक्षांप्रमाणे आता निवडणूक आयोगालाही या माध्यमाचं महत्त्व कळलंय.

Oct 9, 2014, 02:33 PM IST

शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री

 सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.

Oct 9, 2014, 12:35 PM IST

विद्यार्थ्याला टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर ५ वर्षांची बंदी

ब्रिटनच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला आपली टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार हायस्कुल टीचर लिंडा हार्वेनं विद्यार्थ्यांशी फेसबुकद्वारे संपर्क केला होता आणि नंतर फोटो पाठवायला सुरूवात केली. 

Oct 9, 2014, 11:09 AM IST

‘मातोश्री’ची मर्यादा ओलांडू नका - सुषमा स्वराज

सातत्यानं भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी टीका केलीय. आमच्या प्रचार यंत्रणेला ‘अफजल खाना’ची फौज असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ भवनाची मर्यादा ओलांडू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

Oct 9, 2014, 10:38 AM IST

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. 

Oct 9, 2014, 08:55 AM IST

HTC चा १३ मेगापिक्सेल ‘सेल्फी’ स्मार्टफोन लॉन्च

तायवानच्या एचटीसी कंपनीनं बुधावारी त्यांचा हाय रिझॉल्यूशन कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनच्या दोन्ही कॅमेऱ्यांनी आपण सेल्फी काढू शकाल. 

Oct 9, 2014, 08:44 AM IST

हे काय... नरेंद्र मोदींसमोर सचिनची चमक पडली फिकी

असं कदाचित पहिल्यांदाच झालं असेल की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि लोकांची गर्दी त्याच्या आजूबाजूला नाहीय. बुधवारी असं घडलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सचिन तेंडुलकरची चमक जरा फिकी पडलेली दिसली. 

Oct 9, 2014, 08:15 AM IST

पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय. 

Oct 9, 2014, 07:11 AM IST

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी गोविंदाच्या मुलीनं बदललं नाव

कॉमेडी आणि डान्सचे सुपरस्टार गोविंदाची मुलगी नर्मदा आहुजाचं अॅक्टिंगचं करिअर अखेर सुरू होतंय. पण एंट्रीमध्ये एक ट्विस्ट आहे. नर्मदा आपल्या खऱ्या नावानं नाही तर टीना आहुजा या नावानं बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 

Oct 8, 2014, 03:28 PM IST