24taas

नागपूर: शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा!

निवडणूक रणधुमाळीत युती तुटल्यानंतर वारंवार भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना नेते सोडत नाहीयत. पण भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिलाय. 

Oct 14, 2014, 06:48 PM IST

चव्हाण, पवार, फडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना

देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, अजित पवार हे सर्वजण उमेदवार असूनही पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचा फोटो आहे. त्यामुळं या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवारांच्या खर्चात समावेश करावा आणि हा खर्च २८ लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

Oct 14, 2014, 05:03 PM IST

पाकला धक्का, यूनोचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार

काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास यूनोनं नकार दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली होती. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. 

Oct 14, 2014, 03:25 PM IST

ईडीने फ्लिपकार्टला बजावली १ हजार कोटींची नोटीस

ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या 'बिग बिलियन सेल'ची अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) चौकशी सुरू केली असून फ्लिपकार्टला एक हजार कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट रिटेल व्यवहार केल्यानं फ्लिपकार्टनं फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

Oct 14, 2014, 02:39 PM IST

आपल्या Whatsapp वर ट्रांझिस्टरसह दिसेल अनुष्का शर्मा

आपण मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला त्याचा चित्रपट पीकेच्या पोस्टरवर टुकुर-टुकुर करतांना पाहिलंय.पण आता वेळ आहे अनुष्का शर्माची. 

Oct 14, 2014, 02:24 PM IST

फेसबुकनंतर आता ट्विटरद्वारेही मनी ट्रांसफर!

फ्रान्सची एका मोठ्या बँकेनं ट्विटरसोबत डील करण्याती तयारी केलीय. यानंतर या बँकेचे ग्राहक ट्वीट करून मग पैसे ट्रांसफर करू शकतील. ग्राहकांच्या संख्येच्या हिशोबानं दुसऱ्या नंबरवर असलेली बँक बीपीसीईचा हा निर्णय ट्विटरच्या अशाच निर्णयासोबत आलाय. 

Oct 14, 2014, 01:48 PM IST

हुडहुडमुळे 24 जणांचा मृत्यू, पाहणीसाठी पंतप्रधान आज आंध्रला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुडहुड चक्रीवादळानं झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विशाखापट्टणमला जातायेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशा मधील समुद्र किनाऱ्यांवर वादळामुळं खूप नुकसान झालंय.  

Oct 14, 2014, 01:13 PM IST