जनतेनं नाकारलं, मनसेचा फुसका बार, दिग्गज गडगडले!
विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे.
Oct 19, 2014, 05:05 PM ISTविदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री?
विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.
Oct 19, 2014, 04:38 PM ISTUPDATE - विदर्भ विभाग निकाल
दिवाळीपूर्वीच नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालीय.
Oct 19, 2014, 06:57 AM ISTदिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Oct 19, 2014, 06:32 AM ISTदिवाळी आधीच दिवाळी, डिझेल ४ रुपयांनी स्वस्त!
पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच डिझेल स्वस्त झालंय. केंद्रानं नियंत्रण उठविताच डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर ३ रुपये ३७ पैशांच्या कपातीचा निर्णय जाहीर झाला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नसल्यानं प्रत्यक्षातील कपात प्रतिलीटर चार रुपयांपर्यंत असेल.
Oct 19, 2014, 05:51 AM ISTपाहा दिवाळी खरेदीचा महोत्सव!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2014, 03:58 PM ISTज्येष्ठत्वाला संधी मिळणार- खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2014, 03:56 PM IST‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा
भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय.
Oct 18, 2014, 02:40 PM ISTअबब! तब्बल २१ वर्षांनी सापडला जवानाचा मृतदेह
सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात मृत्यूमुखी पडलेल्या जवानाच्या मृतदेहाचे अवशेष तब्बल २१ वर्षांनी सापडले आहेत. सांगलीतील जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या हवालदार टी. व्ही. पाटील यांचा फेब्रुवारी १९९३ साली मृत्यू झाला होता.
Oct 18, 2014, 02:03 PM ISTसंजय पाटील हत्या प्रकरणी विलासकाका उंडाळकरांचा मुलगा निर्दोष
महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणी आमदार विलासकाका उंडाळकरांचे पूत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेली २० महिने उदयसिंह हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात होते.
Oct 18, 2014, 01:34 PM ISTपाकिस्तानचा पुन्हा पूँछमध्ये गोळीबार
पाकिस्तानच्या कारवाया अद्याप सुरूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्ताननं पुन्हा पूँछ जिल्ह्यात गोळीबार केला. पूँछ जिल्ह्यातील हमीरपूर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार केला.
Oct 18, 2014, 12:27 PM ISTगरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत - जितनराम मांझी
बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सध्या वादग्रस्त विधानांमुळं देशभरात चर्चेचा विषय झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान करून नव्यानं चर्चेला विषय पुरवला आहे. गरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचं हात तोडायला हवेत असं विधान मांझी यांनी केलं आहे.
Oct 18, 2014, 11:40 AM ISTदिल्ली वाहतूक पोलिसांनी सुरू केली ‘व्हॉट्स अॅप’ हेल्पलाईन!
दिल्ली वाहतूक पोलिसांनी ‘व्हॉट्स अॅप’ हेल्पलाईन सुरू केलीय. ज्यावर दिल्लीतील स्थानिक रहिवासी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, अनधिकृत पार्किंग, बिघडलेली सिग्नल यंत्रणा आणि अशा इतर समस्यांची ऑडिओ व्हिज्युअल तक्रार पाठवू शकतील.
Oct 18, 2014, 11:20 AM ISTअभिनेत्री मिस्टीच्या निधनाबाबत शिक्कामोर्तब
हॉलिवूड अभिनेत्री मिस्टी अपहम आता या जगात नाहीय. तिच्या निधनाच्या बातमीवर तिच्या कुटुंबियांनी शिक्कामोर्तब केलंय. ती ३२ वर्षांची होती. ‘ऑगस्ट: ओसेज काउंटी’ या फिल्ममध्ये तिनं अभिनय केलाय. ६ ऑक्टोबरपासून मिस्टी बेपत्ता होती.
Oct 18, 2014, 10:18 AM ISTकुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केलाय. परप्रांतियांविरूद्धच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगानं राज ठाकरेंवर नोटीस बजावली होती.
Oct 18, 2014, 09:16 AM IST