24taas

मायक्रोसॉफ्टनं लॉन्च केला ड्युअल सिम मोबाइल फोन ‘नोकिया १३०’

मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसनं आज दोन सिम असलेला मोबाइल फोन नोकिया-१३० लॉन्च केलाय. याची किंमत फक्त आणि फक्त १,६४९ एवढी आहे. 

Oct 27, 2014, 07:13 PM IST

पंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांची आत्महत्या

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक अजय चोरडिया यांनी चिंचवड इथल्या हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडलीय. 

Oct 27, 2014, 06:44 PM IST

राज्याचे मुख्यमंत्री ३१ ऑक्टोबरला घेणार शपथ?

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपानं ३१ ऑक्टोबरचा मुहुर्त साधला असून संध्याकाळी पाच वाजता वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. 

Oct 27, 2014, 06:21 PM IST

दाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!

मुंबईत १९९२ साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमधून आपला मुक्काम हलवला असून आयएसआयच्या मदतीनं तो सध्या पाक-अफगाणच्या बॉर्डरवरील अज्ञातस्थळी लपला असल्याची माहिती समोर येत आहे. 

Oct 27, 2014, 04:52 PM IST

नव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचं भविष्य

नवं सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असं सांगत सुप्रीम कोर्टानं  कॅम्पाकोलावासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळं कॅम्पाकोलावासियांचं भविष्य आता नव्या सरकारच्या हातात आहे. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढं ढकलण्यात आली आहे. 

Oct 27, 2014, 04:06 PM IST

मुख्यमंत्री वानखेडे स्टेडियमवर ३० ऑक्टोबरला शपथ घेण्याची शक्यता

भाजपकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियम बुक केलंय. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी वानखेडेचं बुकिंग करण्यात आलंय. वानखेडेवरच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Oct 26, 2014, 10:09 PM IST