24taas

जेव्हा कोकणचा ‘ढाण्या वाघ’ हरला!

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला तो सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये… नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. राणेंच्या पराभवाची नेमकी कारणं काय पाहूया. 

Oct 26, 2014, 09:27 PM IST

मोदींच्या चहापानाला शिवसेना, मोदींनी मांडल्या आपल्या भावी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडला.

Oct 26, 2014, 09:10 PM IST

सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती स्थिर : रिमा अमरापूरकर

अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती अमरापूरकर यांच्या कन्या रिमा यांनी दिली. अमरापूरकर यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचारावर त्यांच्या कुटुंबियांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

Oct 26, 2014, 08:56 PM IST

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर २८ ऑक्टोबरला होणार शिक्कामोर्तब

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर भाजपातर्फे कोणाची वर्णी लागणार याचं उत्तर २८ ऑक्टोबर रोजी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा हे या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

Oct 26, 2014, 07:59 PM IST

सानिया मिर्झा - कॅरा ब्लॅकनं जिंकली WTA डबल्स चॅम्पियनशीप

डब्ल्यूटीए स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकनं दिमाखदार विजय मिळवून विश्वविजेतेपदक पटकावलं आहे. मिर्झा आणि ब्लॅक या जोडीनं तैपेईच्या सू वेई सेह आणि चीनच्या शूई पेंग यांचा ६-१, ६-० असा पराभव केला.

Oct 26, 2014, 04:56 PM IST

१० मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेनेकडून २१ हजारांचं बक्षिस

दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी अजब घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये अन्य धर्मांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं सिंह यांचं म्हणणं आहे.

Oct 26, 2014, 04:32 PM IST

शिवसेनेचा प्रस्ताव भाजपनं फेटाळला

राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपकडून बहुमताची जुळवाजुळव सुरू झालीय. शिवसेनेकडून भाजपला गेलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळला आहे. 

Oct 20, 2014, 10:35 PM IST

मनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे. 

Oct 20, 2014, 09:39 PM IST