24taas

पारदर्शी आणि राज्याला विकासाकडे नेणारं सरकार देऊ - फडणवीस

आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. त्यानंतर देवेंद्र आणि त्यांच्या कोअर कमिटीनं राज्यपालांकडे सरकार बनविण्याचा प्रस्ताव सादर केला.

Oct 28, 2014, 08:24 PM IST

अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा

 सोनिपत जिल्ह्यातील गोहाना इथं दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ानं पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.

Oct 28, 2014, 06:53 PM IST

पाहा कोण आहेत देवेंद्र फडणवीस?

‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळं मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असं आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलानं आईला बजावून सांगितलं. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावं लागलं. संघ, जनसंघाच्या संस्कारांचं बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री.  त्याचं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा आज प्रत्यक्षात अवतरली आहे. 

Oct 28, 2014, 06:02 PM IST

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषणवणारे फडवणीस हे विदर्भातील चौथे नेते आहेत.

Oct 28, 2014, 05:39 PM IST

परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या

परीक्षेत मार्क वाढवून घेण्यासाठी तसंच मौजमजेसाठी पैशांची गरज भासल्यानं तिघा मित्रांनीआपल्याच मित्राच्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली असून, त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. 

Oct 28, 2014, 04:38 PM IST

शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयानं समन्स बजावलं आहे. तसंच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Oct 28, 2014, 04:08 PM IST

मुसळधार पावसानं भातशेतीचं नुकसान

निलोफर वादळाचा कोकणाला फटका, मासेमारीही ठप्प 

Oct 28, 2014, 11:37 AM IST

दाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!

दाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!   

Oct 28, 2014, 09:09 AM IST