कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केलाय. परप्रांतियांविरूद्धच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगानं राज ठाकरेंवर नोटीस बजावली होती. 

Updated: Oct 18, 2014, 09:16 AM IST
कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता – राज ठाकरे title=

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केलाय. परप्रांतियांविरूद्धच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगानं राज ठाकरेंवर नोटीस बजावली होती. 

त्या नोटीशीबाबत आयोगाकडे स्पष्टीकरण करताना, राज ठाकरेंनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावलेत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलंय. 

परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांना १३ ऑक्टोबर रोजी नोटीस पाठवली होती. पाच ऑक्टोबरला घाटकोपरला आणि सात ऑक्टोबरला कालिनामध्ये झालेल्या सभेत, निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका राज ठाकरेंवर ठेवण्यात आला होता.

"माझ्या हाती सत्ता दिल्यास, आल्या दिवसापासून महाराष्ट्रात जे उद्योग येतील त्या सर्वांमध्ये फक्त मराठी मुलं आणि मुलींना नोकऱ्या मिळतील. परप्रांतातून येणाऱ्यांना नोकऱ्या मिळू देणार नाही", असं वक्तव्य राज ठाकरेंनी पाच ऑक्टोबरच्या घाटकोपरच्या सभेत केलं होतं.

केरळमधील इंटर मायग्रंट लेबर कायद्याकडंही त्यांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलंय. सत्ता आल्यास या कायद्याबाबत विचार केला जाईल, असं राज ठाकरेंनी खुलाशात म्हटलंय.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.