24taas

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाकिस्तान कोर्टानं लखवीला तुरुंगात स्थानबद्द करण्याचा पाक सरकारचा निर्णय रद्द केला आहे.

Dec 29, 2014, 12:52 PM IST

कोल्हापूर विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील लेडिज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया कृष्णा पाटील असं या विद्यार्थीनीचं नाव असून ती एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. 

Dec 29, 2014, 11:23 AM IST

बंगळुरू स्फोट हा दहशतवादी हल्लाच – किरण रिजीजु

बंगळुरुमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजु यांनी म्हटलंय. या स्फोटामागे सिमीचा हात असण्याची शक्यताही रिजीजु यांनी वर्तवलीय. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर देशभर अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती रिजीजु यांनी दिलीय.

Dec 29, 2014, 10:58 AM IST

एअर एशियाचं बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त, समुद्रात कोसळल्याची शक्यता

एअर एशियाचे बेपत्ता झालेलं QZ८५०१ समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. विमान समुद्राच्या तळाशी गेलं असण्याची शक्यता इंडोनेशियन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

Dec 29, 2014, 10:27 AM IST

फेसबुकनं मागितली आपल्या युजर्सची क्षमा!

येणाऱ्या नव्या वर्षात मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फेसबूकनं आपल्या युजर्सला ‘इअर इन रिव्ह्यू’ची भेट दिली होती. मात्र या भेटीनं मनस्ताप घडवला असल्याची भावना युजर्समध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं फेसबुकनं आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.

Dec 29, 2014, 09:51 AM IST

आता प्रत्येकाला मिळणार कमीत कमी १५ हजार पगार?

केंद्र सरकारनं औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रात राष्ट्रीय मासिक सॅलरी १५,००० रुपये करण्याची तयारी सुरू केलीय. राष्ट्रीय किमान वेतन कायदा १९४८ अंतर्गत ४५ प्रकारच्या आर्थिक उपक्रमांना या अॅक्टमध्ये सूचीबद्ध केलं गेलंय आणि या अॅक्टला राज्यांमध्येही लागू केलं गेलं. राज्य १,६०० प्रकारच्या आर्थिक उपक्रमांना या अॅक्टअंतर्गत आणू शकतो. 

Dec 29, 2014, 09:07 AM IST

२४ तासानंतरही १६२ प्रवाशांसह एअर एशियाचं विमान बेपत्ता!

एअर एशियाचं इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारं विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झालंय. त्यानंतर २४ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही. प्रवाशांत १६ लहान मुले आणि नवजात अर्भक यांचा समावेश आहे. 

Dec 29, 2014, 08:02 AM IST