24taas

झारखंडचे १०वे मुख्यमंत्री म्हणून रघुवर दास यांनी घेतली शपथ

झारखंडचे १०वे  मुख्यमंत्री म्हणून रघुवर दास यांनी आज शपथ घेतली. खराब हवामानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. पंतप्रधानांनी ट्विटरवरून झारखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. 

Dec 28, 2014, 03:22 PM IST

स्मार्टफोन ग्राहकांसाठी ट्विटरनं आणलंय नवं फीचर!

ट्विटरनं आपल्या मोबाईल अॅपमध्ये नवं फीचर आणलंय. ज्याच्या मदतीनं आपण आपलं ट्विट किती जणांनी वाचलं, रिट्विट केलं हे आपल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे. ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग मॅनेजर इयान चान यांनी सांगितलं, “यासाठी आपल्याला ट्विटरच्या अॅनॅलिटिक्स पेजवर साइन इन करावं लागेल, जेणेकरून कंपनी आपल्या मोबाईल डेटाचा संग्रह सुरू करू शकाल.” 

Dec 28, 2014, 02:02 PM IST

फिरकीपटू प्रज्ञान ओझाची गोलंदाजी शैली सदोष, स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाद

पाकिस्तानी गोलंदाजांपाठोपाठ आता एका भारतीय गोलंदाजाची शैलीही सदोष असल्याचं समोर आलं आहे. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझावर सदोष गोलंदाजी शैलीमुळं बीसीसीआयनं बंदी घातली आहे.

Dec 28, 2014, 12:11 PM IST

पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग गाडीला अपघात, ३ पोलीस ठार

पुण्याजवळील पानवडी घाटात पोलिसांची गाडी कोसळल्यानं तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण पोलिसांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.

Dec 28, 2014, 11:40 AM IST

कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक, वाचा फायदे!

कोथिंबीरीच्या वापरानं आपलं आरोग्य चांगलं राखण्यात फायदाच होतो. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होतो. 

Dec 28, 2014, 11:15 AM IST

इंडोनेशियामध्ये एअर एशियाचं विमान बेपत्ता, १६२ प्रवाशांचा जीव धोक्यात

एअर एशियाचं विमान QZ 8501 बेपत्ता झालंय. १६२ प्रवासी असलेलं हे विमान इंडोनेशियामधून सिंगापूरला जात होतं. सकाळी ७.२४ला विमान बेपत्ता झाल्याचं एअर एशियानं सांगितलंय. 

Dec 28, 2014, 10:14 AM IST

व्हिडिओ: आयुषमानच्या ‘हवाइजादा’च्या ट्रेलरला १० लाख हिट्स!

अभिनेता-गायक आयुषमान खुराणा आपल्या नव्या फिल्मसह प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालाय. त्याचा आगामी चित्रपट ‘हवाइजादा’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धमाल करतोय. मंगळवारी रिलीज झालेल्या या ट्रेलरनं आतापर्यंत १० लाख हिट्सचा टप्पा ओलांडलाय. 

Dec 28, 2014, 09:12 AM IST

राज्याला हुडहुडी, थंडीचा जोर वाढला!

या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्हा वाढला. काही शहरांचं किमान तापमान वेगानं घसरलं. नागपूरमध्ये सर्वांत कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविलं गेलं.

Dec 28, 2014, 08:37 AM IST

कपडे वाळवताना ग्रीलचा शॉक लागून जोडप्याचा मृत्यू

वीजेचा शॉक लागल्यानं एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुझ इथं शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. इथल्या गजाधरबंदच्या गजधर रोडवरील कल्पना डेअरीमागे हे दाम्पत्य राहत होतं.

Dec 28, 2014, 08:10 AM IST

ई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मिळाली मंजुरी

बहुचर्चित असलेलं ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमतानं मंजुर करण्यात आलं. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आलं. 

Dec 18, 2014, 06:21 PM IST

२६/११चा मास्टरमाईंड लकवीला जामीन, पण सुटका नाही

दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे. 

Dec 18, 2014, 04:40 PM IST

विना व्यायाम सुद्धा चरबी करू शकता कमी!

शरीरातील जास्तीची चरबी घटविण्यासाठी आता खूप भारी व्यायाम करण्याची गरज नाही. साधा व्यायाम करत जास्तीत जास्त श्वास घेणं आणि सोडल्यानं सुद्धा अतिरिक्त चरबी घटते. एका नव्या अभ्यासानुसार संशोधकांनी सांगितलं की, निष्कर्षामध्ये ही बाबत समोर आलीय की, फुफ्फुसांमध्ये चरबी प्राथमिक एक्स्रेटरी अवयव आहे. त्यांच्या मते, शरीरातील 80 टक्क्यांहून अधिक अतिरिक्त चरबी यामुळं कमी केली जावू शकते. 

Dec 18, 2014, 04:17 PM IST

चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालपणावर परिणाम - सत्यार्थी

शांततेचं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होतंय, असं म्हटलं. यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावण्याची गरज असल्याचंही सत्यार्थी म्हणाले. 

Dec 18, 2014, 02:51 PM IST