24taas

सिडनीतील ओलिस नाट्य १७ तासांनी संपले, भारतीय सुखरूप

सिडनीमध्ये एका कॅफेमध्ये ३० - ४० जणांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलेल्या दहशतवाद्याचे नाव शेख हारून मोसीन असल्याचे वृत्त आहे.

Dec 15, 2014, 08:34 AM IST

कतारमध्ये क्रिकेट खेळतांना भारतीयाचा मृत्यू

एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला. 

Dec 14, 2014, 03:02 PM IST

Google नं ‘शोमॅन’ला समर्पित केलं Doodle

गूगलनं भारतीय सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आजचं ‘डूडल’ त्यांना समर्पित केलंय. गूगलनं ‘डूडल’मध्ये राज कपूर यांची मोस्ट आयकॉनिक फोटो म्हणजे त्यांची ब्लॉकबस्टर फिल्म ‘श्री४२०’चं पूर्ण पोस्टरला जागा दिलीय. श्री४२० चित्रपट १९५५मध्ये रिलीज झाला होता. यात राज कपूर यांची हिरोइन नर्गिस होती. 

Dec 14, 2014, 01:54 PM IST

ड्रग्जचा होतो '3D' परिणाम, 'त्या' पैशांचा दहशतवादासाठी वापर- मोदी

ड्रग्स किंवा अमली पदार्थांचं सेवन करणं हे स्टाईल स्टेटमेंट नाही ते फक्त विनाशाचं कारण ठरतं, त्यामुळं त्याच्या विळख्यातून बाहेर पडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरूणांना केलं. आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद सादत अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावलं. 

Dec 14, 2014, 12:41 PM IST

हिंदुजांनी ‘ओल्ड वार ऑफिस बिल्डिंग’चं केलं अधिग्रहण

भारतीय वंशाचे बिझनेसमन एस.पी.हिंदुजांच्या हिंदुजा समूहानं स्पॅनिश औद्योगिक कंपनीसोबत मिळून ब्रिटनचं महत्त्वपूर्ण असलेलं ‘ओल्ड वार ऑफिस बिल्डिंग’चं अधिग्रहण केलंय. या बिल्डिंगमध्ये कधी काळी ब्रिटनचे युद्धकाळातील पंतप्रधान विन्सटन चर्चिल यांचं वास्तव्य होतं. 

Dec 14, 2014, 12:12 PM IST

...म्हणून फेसबुकवर नसतं डिसलाइकचं ऑप्शन!

 सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेलं ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचं सर्वाधिक पसंतीचं माध्यम म्हणजे फेसबुक होय. 

Dec 14, 2014, 11:24 AM IST

झारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात

झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

Dec 14, 2014, 11:07 AM IST

डोंबिवलीचं नाव गिनीज बुकात, सर्वात मोठं पझल बनवण्याचा विक्रम

सांस्कृतिक शहर डोंबिवलीचं नाव आता गिनीज बुकात नोंदलं गेलंय. ११० दिवस मेहेनत करून जिगसॉ पझल तयार करण्यात आलंय. जगातलं हे सर्वात मोठं जिगसॉ पझल आहे. डोंबिवलीतल्या बंदिस्त क्रीडासंकुलात हे अनोखं भव्य पझल प्रेक्षकांसाठी पाहायला खुलं आहे.

Dec 14, 2014, 11:00 AM IST

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. 

Dec 14, 2014, 10:37 AM IST

मोदींच्या अटकेची मागणी करावी काय? – ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील, असं जाहीर करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मित्रंच्या अटकेवरून भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

Dec 14, 2014, 10:08 AM IST

आझाद मला पीके म्हणतो- आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या खूपच खूश आहे. कारण त्याचा आगामी चित्रपट ‘पीके’बद्दल त्याच्या कुटुंबातूनच एक खास प्रतिक्रिया आलीय. आमीरनं सांगितलं की, त्याचा मुलगा आझाद त्याला पीके म्हणतो आणि चित्रपटातील आमीरच्या डांसची नक्कलही करतो. 

Dec 14, 2014, 09:03 AM IST