सिडनीतील ओलिस नाट्य १७ तासांनी संपले, भारतीय सुखरूप

सिडनीमध्ये एका कॅफेमध्ये ३० - ४० जणांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलेल्या दहशतवाद्याचे नाव शेख हारून मोसीन असल्याचे वृत्त आहे.

Updated: Dec 16, 2014, 10:11 AM IST
सिडनीतील ओलिस नाट्य १७ तासांनी संपले, भारतीय सुखरूप title=

सिडनी : तब्बल १७ तासांनंतर ऑस्ट्रेलियातलं ओलिस थरारनाट्य संपलंय. सिडनीच्या लिंट चॉकलेट कॅफेमध्ये बंदी बनवण्यात आलेल्या ओलिसांची सुटका झालीय. त्यामध्ये दोघा भारतीयांचा समावेश आहे.

अंकीत रेड्डी आणि पुष्पेंदू घोष अशी या दोघा भारतीय नागरिकांची नावे आहेत. तर या अपहरण नाट्यात दोघा ओलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियन मीडियानं दिलीय. तर या घटनेत अनेक बंधक जखमी झाले असून, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी लिंट चॉकलेट कॅफेचा ताबा घेतलाय.

दरम्यान, हे सर्व ओलिसनाट्य घडवणा-या दहशतवाद्याची ओळख पटलीय. शेख हारून मोनीस असं त्याचं नाव असून, तो इराणचा नागरिक आहे.  त्याच्यावर आपल्या पत्नीचा खून केल्याचाही गुन्हा दाखल असल्याचं समजतंय. या इराणी दहशतवाद्याला ठार करण्यात आलंय.

रात्री १० वाजता

सिडनी थरार नाट्यातील दोन्ही भारतीय बचावले आहेत, हल्लेखोर मन हारून मोरीस मारला गेला असल्याचं सांगण्यात येत आहे, विश्ननाथ अंकी रेड्डी, आणि पुष्पेन्दू घोष हे दोन्ही भारतीय बचावले आहेत.

रात्री  ९.४१ वाजता:

सिडनीमध्ये थरार नाट्य १७ तासांनंतर संपले.... पोलिसांच्या कारवाईत २ जण ठार तर तीन जण जखमी असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन मीडियाने दिले. तीन जखमींची प्रकृती चिंताजनक... 

रात्री  ९.०० वाजता:

सिडनीमध्ये एका कॅफेमध्ये पोलीस घुसले. दहशतवाद्याच्या ताब्यातून भारतीय ओलिस अंकीत रेड्डीची सुटका... ओलिसांना बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन पोलिसांचे ऑपरेशन... सिडनी पावणे दोन वाजता करण्यात आली कारवाई... ऑस्ट्रेलियातील थरार नाट्य संपले... चॅनल ९ची माहिती. 

 

सायंकाळी ७.३० वाजता:

सिडनीमध्ये एका कॅफेमध्ये ३० - ४० जणांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलेल्या दहशतवाद्याचे नाव शेख हारून मोसीन असल्याचे वृत्त आहे. हारून हा कडव्या विचारसरणीचा मुस्लीम धर्मगुरू असून १९९६मध्ये तो इराणमधून पळून ऑस्ट्रेलियात आल्याचे वृत्त आहे.

 

The incident in Sydney is disturbing. Such acts are inhuman & deeply unfortunate. I pray for everyone's safety.

— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2014

सायंकाळी ६.०० वाजता:

आयटी कंपनी इन्फोसिसने दावा केला की ऑस्ट्रेलियाच्या मॉर्टिन प्लेस येथील लिंड्ट चॉकलेट कॅफेमध्ये ओलिस ठेवण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक हा त्यांचा भारतीय कर्मचारी आहे. कंपनीने या संदर्भात एक पत्रक काढून ही माहिती दिली.

दुपारी ३.१५ वाजता:

संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, बंधक बनविण्यात आलेल्यांपैकी भारतीय असल्याबद्दल कोणीतही अधिकृत माहिती मिळाली नाही. 

दुपारी १.१५ वाजता:

कॅफेतून सहाव्या ओलिसाची सुटका, लिंट चॉकलेट कॅफेमध्ये अडकलेल्यांमध्ये एक भारतीय ओलिस असल्याची माहिती. परराष्ट्र मंत्रालय भारतीय दूतावासाच्या संपर्कात

सकाळी ११.४५ वाजता: 

आणखी दोन बंधकांना पळून जाण्यात यश

सिडनी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविली

इसिसनं २ महिन्यांपूर्वी मुंबईतील धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याची धमकी दिली होती. धार्मिक स्थळाची सुरक्षा व्यवस्था वाढविली. इस्कॉन मंदिर, स्वामी नारायण मंदिर, पुण्यातील २ मंदिरांची सुरक्षा वाढविली. 

सकाळी ११.४३ वाजता: 

सिडनीतील कॅफेती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळी ११.१३ वाजता: 

सिडनीतील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट 

सकाळी ११.११ वाजता:

कॅफेत एकही भारतीय नागरीक नाही, 
ऑस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाची माहिती
सिडनीचा हार्बर ब्रीज केला बंद

सकाळी ११ वाजता:

सिडनी घटनेनंतर भारतात सुरक्षा व्यवस्थेची तातडीची बैठक

सकाळी १०.३० वाजता:

घटनेमागे अल नुसरा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे.
अल नुसरा अल कायदा आणि इसिसची संबंधित असलेली संघटना
६ तासांपासून आलिस नाट्य सुरू

सकाळी १० वाजता:

लिंक चॉकलेट कॅफमध्ये ५० जणं ओलिस असल्याची माहिती
पोलिसांकडून दुजोरा

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी इथं एका कॅफेमध्ये ३०-४० ग्राहकांना बंधक म्हणून ठेवलं आहे, दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

ओपेरा हाऊसजवळ असलेल्या एका कॅफेत गेल्या काही तासांपासून हे थरारनाट्य सुरू आहे. ओलीसांचा नेमका आकडा माहित नसला तरी सुमारे ३०-४० ओलीस असून त्यात कॅफेच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार घटनास्थळी गोळीबार किंवा रक्तपात झाला नाही आहे. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या तिघांना खिडकीत उभं केलं आहे. ज्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळं बंदुकीच्या धाकावर हल्लेखोर आपला कोणते हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सध्या तरी कळू शकत नाही.

ओलीसांच्या त्यांच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. मात्र या कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान सिडनीतील ही घटना अमानवी आणि दुर्दैवी असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे. सर्वांची सुखरूप सुटका व्हावी अशी प्रार्थना करतो, असंही त्यांनी म्हटलंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.