आज ठरणार 'मिस वर्ल्ड २०१४'

जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये आज रविवारी रात्री होत आहे. या स्पर्धेचे हे 64 वे वर्ष आहे. अंतिम फेरीत एकूण 122 स्पर्धक तरुणींची निवड करण्यात आली आहे. 

Updated: Dec 14, 2014, 09:36 PM IST
आज ठरणार 'मिस वर्ल्ड २०१४' title=

लंडन : जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये आज रविवारी रात्री होत आहे. या स्पर्धेचे हे 64 वे वर्ष आहे. अंतिम फेरीत एकूण 122 स्पर्धक तरुणींची निवड करण्यात आली आहे. 

भारताच्या कोयल राना हिची  या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.  
LIVE VIDEO पाहा सर्वात खाली

कोयलचं सामाजिक कार्य
कोयल ही केवळ सुंदर नसून ती बुद्धीमान असून स्वभावाने प्रेमळही आहे. ती स्वच्छतेसाठी काम करणारी मोक्ष नावाची स्वयंसेवी संस्था चालविते. कोयलने यापूर्वी अनेक स्पर्धेत सहभाग घेतला असून विजेतेपदही पटकाविले आहे. 

या स्पर्धेत कोयलला यापूर्वीच बेस्ट डिझायनरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे तिचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.