Exclusive: मुंबईतील खाजगी,टुअरिस्ट टॅक्सींचं सुरक्षेबाबतचं वास्तव
दिल्लीमध्ये उबर कॅबमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खाजगी टॅक्सी आणि टूरिस्ट कॅब संशयाच्या विळख्यात आले आहेत. खाजगी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब का होऊ शकतात दुर्घटनांचं कारण, याचा तपास करणारा हा रिपोर्ट...
Dec 11, 2014, 08:30 PM ISTलोकलमधील भजनी मंडळ आता बंद!
मुंबईतील उपनगरीय रेल्वेडब्यांत भजन करण्यास आता रेल्वे पोलिसांनी बंदी घातलीय. अशा भजनीमंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे आयुक्तांनी दिलेत.
Dec 11, 2014, 05:43 PM ISTबनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या आरोपींनी मिळवला जामीन
चक्क कोर्टाचा बनावट आदेश तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्यांनतर या दोन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्यात आलीय.
Dec 11, 2014, 05:28 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर
दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केलीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करण्यात आलीय.
Dec 11, 2014, 04:22 PM ISTमनसेतून बाहेर पडलेल्यांशी संबंध ठेवायचा नाही, राज ठाकरेंचे आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडलेल्यांशी संबंध न ठेवण्याचे आदेश मनसे कार्यकर्तांना दिले आहेत. याचा पहिला ट्रेलर राज यांनी मुंबईतल्या मनसे नगरसेवकांच्या घेतलेल्या बैठकीत पाहायला मिळाला.
Dec 11, 2014, 03:54 PM ISTसीमावासियांसंदर्भात मोहन जोशींचं वादग्रस्त वक्तव्य
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त विधानामुळं बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. एकीकडे बेळगावात मराठीचा एल्गार मोठा होत असताना नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Dec 11, 2014, 03:22 PM ISTव्हिडिओ: जगातील प्रत्येक मोठा भाऊ असाच असतो?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वायरल होतोय. तो म्हणजे जगातिल प्रत्येक मोठा भाऊ कसा वागतो. आपल्या लहान भावांसोबत मोठा भाऊ असाच वागतो का?
Dec 11, 2014, 03:05 PM ISTनरेंद्र मोदींना 'गोल्डन ट्विट'चा किताब
सोशल मीडियाचा खुबीनं वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला 'गोल्डन ट्वीट २०१४' हा किताब मिळाला आहे. सर्वाधिक रिट्विटसाठी हा पुरस्कार दिला जातो.
Dec 11, 2014, 01:58 PM ISTरणजीत जम्मू काश्मीरचा ऐतिहासिक विजय, मुंबईला हरवलं
रणजी क्रिकेटमध्ये लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरच्या टीमनं मुंबईसारख्या 'दादा' संघाचा पराभव करत आपणही क्रिकेटमधील 'पक्के' खेळाडू असल्याचं दाखवून दिलंय. आज वानखेडे स्टेडियमवरील मॅचमध्ये जम्मू काश्मीरनं मुंबईचा चार विकेटनं पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
Dec 10, 2014, 09:03 PM ISTमलाला माझी पाकिस्तानी मुलगी, मी तिचा भारतीय पिता - कैलाश सत्यार्थी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 07:55 PM ISTमलाला माझी पाकिस्तानी मुलगी, मी तिचा भारतीय पिता - कैलाश सत्यार्थी
मलाला युसुफजाई ही माझी पाकिस्तानी मुलगी आहे आणि मी तिचा भारतीय पिता असल्याचे उद्गार मलालासोबत संयुक्त नोबेल पारितोषिक स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी काढले.
Dec 10, 2014, 07:15 PM ISTबाबा रामपालबद्दल 10 धक्कादायक खुलासे
हरियाणाच्या बरवालामधील सतलोक आश्रमामध्ये भक्तीच्या नावाखाली साम्राज्य चालवणारे संत रामपाल आता तुरुंगाची हवा खात आहे. पोलिसांनी त्यांचे शिष्य, सहकाऱ्यांकडून रामपालचे अनेक गुपित उघड करवले आहेत. वाचा रामपालशी निगडीत असे गुपित जे त्यांच्या भक्तांनी आणि सहकाऱ्यांनी उघड केले.
Dec 10, 2014, 07:02 PM ISTआता आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे गुन्हा नाही, कलम 309 संपणार
आत्महत्येचा प्रयत्न करणं हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणारं भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
Dec 10, 2014, 05:28 PM ISTबाप रे बाप! 10 वर्षाची ही मुलगी सिंह आणि चित्त्यासोबत झोपते
10 वर्षाची एक मुलगी जिचा मित्र आहे एक सिंह. तिला चित्त्यासोबत झोपायला आवडतं. ती दररोज लांडग्यासोबत खेळते. याला आपण काय म्हणाल सिंह, चित्ता आणि लांडग्यासोबक राहणं तर दूर त्यांच्याजवळ जाण्याबद्दल आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र सौदी अरेबियामधील ही 10 वर्षीय चिमुरडी या तिन्ही प्राण्यांसोबत आपल्या घरात राहते. तिला अजिबात भीती वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे प्राणी तिला अजिबात नुकसान पोहोचवत नाहीत.
Dec 10, 2014, 04:38 PM IST