विना व्यायाम सुद्धा चरबी करू शकता कमी!

शरीरातील जास्तीची चरबी घटविण्यासाठी आता खूप भारी व्यायाम करण्याची गरज नाही. साधा व्यायाम करत जास्तीत जास्त श्वास घेणं आणि सोडल्यानं सुद्धा अतिरिक्त चरबी घटते. एका नव्या अभ्यासानुसार संशोधकांनी सांगितलं की, निष्कर्षामध्ये ही बाबत समोर आलीय की, फुफ्फुसांमध्ये चरबी प्राथमिक एक्स्रेटरी अवयव आहे. त्यांच्या मते, शरीरातील 80 टक्क्यांहून अधिक अतिरिक्त चरबी यामुळं कमी केली जावू शकते. 

Updated: Dec 18, 2014, 04:17 PM IST
विना व्यायाम सुद्धा चरबी करू शकता कमी! title=

मेलबर्न: शरीरातील जास्तीची चरबी घटविण्यासाठी आता खूप भारी व्यायाम करण्याची गरज नाही. साधा व्यायाम करत जास्तीत जास्त श्वास घेणं आणि सोडल्यानं सुद्धा अतिरिक्त चरबी घटते. एका नव्या अभ्यासानुसार संशोधकांनी सांगितलं की, निष्कर्षामध्ये ही बाबत समोर आलीय की, फुफ्फुसांमध्ये चरबी प्राथमिक एक्स्रेटरी अवयव आहे. त्यांच्या मते, शरीरातील 80 टक्क्यांहून अधिक अतिरिक्त चरबी यामुळं कमी केली जावू शकते. 

जेवणात असलेले कार्बोहायड्रेट हे प्रोटीन ट्रायग्लिसराइडमध्ये बदलले जातात. ज्यात तीन प्रकारचे अणू कार्बन, हायड्रोजन किंवा ऑक्सिजन असतात. संशोधकांच्या मते, अधिकची चरबी दूर करण्यासाठी ट्रायग्लिसराइड अणूंपासून परमाणूंना मुक्त करण्याची गरज असते, ज्याला 'ऑक्सिकरण' प्रक्रिया म्हटलं जातं. 

ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सचे संशोधक रूबेन मीरमान किंवा अँड्रयू ब्राउननं सांगितलं, चरबी कमी करण्यासाठी चरबी पेशीमध्ये असलेलं कार्बन मुक्त करण्याची गरज असते. ज्यासाठी सांगितलं जातं की, कमी खा आणि अधिक फेरफटका मारा. संशोधनादरम्यान त्यांना आढळलं की, जर शरीरात 10 किलोग्राम चरबी पूर्णपणे ऑक्सिकृत असतं, तर त्या 8.4 किलो आतड्यांमधून कार्बन डाय ऑक्साइडच्या रुपात बाहेर पडते. तर उर्वरित 1.6 किलो पाणी बनतं.
या विश्लेषणानंतर ही बाब स्पष्ट होतं की, या मेटाबॉलिक प्रक्रियेसाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असते. हा अहवाल नियतकालिक 'ब्रिटिश मेडिकल जर्नल'मध्ये प्रकाशित झालंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.