24taas

आरबीआयचं पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही

रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. 

Dec 2, 2014, 11:39 AM IST

धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयामुळं महिलेची नग्न धिंड

देशात वारंवार महिलांवरील अत्याचारात वाढ होतांना दिसतेय. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या संशयामुळं एका आदिवासी महिलेला नग्न करुन तिची धिंड काढण्यात आली.

Dec 2, 2014, 11:24 AM IST

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचं निधन

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचं आज निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Dec 2, 2014, 11:03 AM IST

आरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार?

रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे. 

Dec 2, 2014, 10:35 AM IST

ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचं निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचं आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते.

Dec 2, 2014, 09:26 AM IST

जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान

जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानानंतर आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. १८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून जम्मूच्या ९ तर काश्मीरच्या ९ जागांवर मतदान होतंय.

Dec 2, 2014, 08:31 AM IST

तीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - फडणवीस

अखेर शिवसेना-भाजप एकत्र येणार, अशी शक्यता आहे. एका फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये अखेर एकमत झालं असून नेतृत्त्वाकडून आज घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीये. 

Dec 2, 2014, 08:12 AM IST

ह्युजच्या सन्मानार्थ क्लब बॅट्समननं दिली रेकॉर्डला तिलांजली

विक्टोरियामध्ये एका क्लब मॅचमध्ये बॅट्समननं फिलीप ह्युजला एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली देत, एक खूप जुना रेकॉर्ड तोडण्याची सुवर्ण संधी सोडून दिली. 

Dec 1, 2014, 03:10 PM IST

भाजपची शिवसेनेला ४ कॅबिनेट, ७ राज्यमंत्रीपदाची ऑफर

भाजपनं शिवसेनेला ४ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची आज आणखी एक फेरी होणार आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची चर्चा सकारात्मक सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटणार आहेत. 

Dec 1, 2014, 01:54 PM IST

वायरल व्हिडिओ: जेव्हा एका भावानं काढली आपल्या बहिणीची छेड

सरकारनं महिला छेडछाडी विरोधात अनेक कडक कायदे बनवले आहे. मात्र तरीही छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. दररोज आपण महिला छेडछाडीविरोधात अनेक घटना वाचतो आणि पाहतो. अनेक सर्व्हेंमध्ये हे दिसून आलंय की, महिला सर्वाधिक असुरक्षित आपल्या घरातच मानतात. 

Dec 1, 2014, 01:34 PM IST