अग्नी-५, आता पुढे काय?
अमित जोशी
19 एप्रिल २०१२ ला ओडिसा जवळील व्हीलर बेटांवरुन आठ वाजून दोन मिनिटांनी अग्नि -५ या पहिल्या आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. ५० टन वजनाचे अग्नि क्षेपणास्त्र 50 मीटर एवढा आगीचा झोत मागे सोडत गर्जना करत अरबी समुद्रातील नियोजीत लक्ष्याच्या ठिकाणी निघाले