19 एप्रिल २०१२ ला ओडिसा जवळील व्हीलर बेटांवरुन आठ वाजून दोन मिनिटांनी अग्नि -५ या पहिल्या आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. ५० टन वजनाचे अग्नि क्षेपणास्त्र 50 मीटर एवढा आगीचा झोत मागे सोडत गर्जना करत अरबी समुद्रातील नियोजीत लक्ष्याच्या ठिकाणी निघाले. 22 मिनीटात ते लक्ष्याच्या ठिकाणी अचूक पोहचले. या क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे Text Book Launch असे वर्णन डीओरडीओच्या शास्त्रज्ञांनी केली, म्हणजेच जशी चाचणीची आखणी केली होती अगदी तसेच घडले.
.
अग्नी -5 च्या चाचणीने काय साध्य झाले ?
1..... अग्नी -5 हे क्षेपणास्त्र 5000 किमी ते 5800 किमी एवढ्या अंतरापर्यंत मारा करु शकते. यामुळे संपूर्ण चीन, जवळपास सर्व रशिया ( उत्तरे-पूर्वेकडचा भाग नाही ) , इस्त्राईलच्या पुढचा सिरिया, अर्धा युरोप, आफ्रिकेचा केनिया, इकडे जपान , ऑस्ट्रेलिया पासून काही अंतरावरचा भाग एवढा विस्तिर्ण भाग आवाक्यात आला. त्यामुळे फक्त चीन नाही तर वेळ पडल्यास एवढ्या भागांतील देशांवर वचक ठेवण्याची क्षमता यामुळे प्राप्त झाली.
.
२..... अग्नी -५ हे क्षेपणास्त्र ५००० किमीचे अंतर गाठतांना साधारण मधल्या पल्ल्याच्या वेळी सुमारे 600 किमी एवढी उंची गाठते. अग्नी -५ च्या यशस्वी चाचणीमुळे Reentry Technology मध्ये आपल्याला यश आले. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जात पुन्हा वातावरणात प्रवेश करतांना क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असतो. यातच वातावरणाशी घर्षण झाल्याने क्षेपणास्त्र हवेतच जळुन नष्ट होण्याचा धोका असतो. मात्र आपण ही अवघड चाचणी यशस्वी केली. क्षेपणास्त्राचा शेवटचा टप्पा 300 किमीच्या उंचीवर संपला. स्फोटकं असलेला क्षेपणास्त्राचा भाग वातावरणातील उष्णतेचा कुठलाही परिणाम न होता नियोजित ठिकाणी कोसळला. वातावरणात प्रवेश करुन परत येतांना टिकून रहाणा-या विशिष्ट धातूंच्या निर्मिती कसोटीला उतरली. या धातूचा फायदा भविष्यातील मानवी मोहिमांकरता होणार आहे.
.
३..... गरज पडल्यास या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने आपण एक टन वजनापर्यंतचा छोटा उपग्रह अवकाशात सोडू शकतो.
.
४...... अग्नी -५ क्षेपणास्त्र प्रवासादरम्यान ६०० किमी पर्यंतची उंची गाठते. या उंचीवर किंवा या कक्षेत साधारण टेहळणी उपग्रह , पृथ्वीची छायाचित्र काढणारे उपग्रह, पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करणारे उपग्रह असतात. तेव्हा अग्नी -५ च्या चाचणीने या उंचीवरील एखादा उपग्रह नष्ट करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे.
.
५.....अग्नी- ५ मुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झालीये. कारण एक टन वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमात अग्नी -५ ची आहे. म्हणजेच शेवटच्या टप्प्यात ५० ते अगदी २५० किलोटन क्षमतेचे एक ते चार अणु बॉम्ब ठेवू शकतो. हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर
टाकलेल्या अणु बॉम्बची क्षमता प्रत्येकी १५ ते २० किलोटनच्या आसपास होती. यावरुन अग्नी- ५ ची विध्वंसक क्षमता किती आहे याचा अंदाज येऊ शकतो. मुख्य म्हणजे असा मारा हे Multiple Independently Targetable Reentry च्या तंत्रामुळे शक्य होतो. हे तंत्रज्ञान अग्नी -५ मध्ये वापरता येऊ शकते. त्यामुळे गरज पडल्यास एकाच वेळी विविध शहरांवर मारा करता येऊ शकतो. या गोष्टींमुळे अग्नी -५ ची यशस्वी चाचणी हा देशा