assembly elections

हरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचं पानिपत!

महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.

Oct 19, 2014, 07:35 PM IST

मुंबई पोलिसांची झोपच उडालेय...

 विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि मुंबई पोलिसांची झोपच उडालेय. ऐन सणाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या निवडणुका आणि दहशतवादी संघटनेकडून आलेली धमकी, त्यामुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून पाहारा द्यावा लागणार आहे.

Sep 13, 2014, 07:29 PM IST

मोदी-राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांचा सरकारचा दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय. या निवडणुकीत दोघांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमचेच सरकार येण्याचा दावा केला आहे.

Sep 12, 2014, 06:58 PM IST

गणेशोत्सव संपला, निवडणुका कधी?

गणेशोत्सव संपला, निवडणुका कधी?

Sep 11, 2014, 08:52 PM IST

९ ते १७ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक

गणेशोत्सवाची धामधूम संपता संपता, आता लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आजपासून राज्यात विधानसभा निवडणुकांचे नगारे वाजू लागणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आजच घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. ९ ते १७ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होईल, अशी माहिती मिळत आहे.

Sep 9, 2014, 08:16 AM IST

राष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असला तरी राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळत नाहीयत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्यामुळं या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या घटल्याचं चित्र यावेळी दिसतंय.

Sep 6, 2014, 10:14 AM IST

महाेत्सव विधानसभा निवडणुकांचा

अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज झालाय. सण साजरे करतानाच राज्याला वेध लागलेत ते लोकशाहीच्या उत्सवाचे, अर्थात निवडणुकांचे. संस्कृती जपणारे आपले सण आणि लोकशाही घडवणारा निवडणुकांचा उत्सव. यांची एक वेगळी सांगड. मतदारराजासाठी. 

Aug 28, 2014, 10:06 AM IST

विधानसभा निवडणुकीआधी वातावरण तापले, काँग्रेस-सेनेत हलचल

घोटाळेबाज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला खाली खेचा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोटीमध्ये केलंय. तर छगन भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केलेय. नवी मुंबईत काँग्रेसचे पदाधिकारी सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.

Aug 20, 2014, 10:47 PM IST

विधानसभेसाठी अर्ध्या जागा द्या... नाहीतर...!

जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचा मान राखावा अन्यथा आणखी एक चांगला मित्र गमावण्याची वेळ काँग्रेसवर येईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलाय. 

Jul 22, 2014, 05:11 PM IST

राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Jul 17, 2014, 06:59 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा - शरद पवार

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन महिने मिळणार आहेत. या कालावधीत मंत्र्यांनी जोमाने कामावे लागवे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत.

May 10, 2014, 05:34 PM IST

चिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध

केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली.

Apr 30, 2014, 01:18 PM IST

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठार

मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर यीसकुल भागात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात तीनजण ठार आणि सातजण जखमी झाले आहेत. जखमींना आरआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय.

Oct 30, 2013, 10:48 AM IST