बिहारचे नवे मुख्यमंत्री ठरणार? लालूंना घातली साद
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.
May 18, 2014, 10:16 AM ISTअपेक्षित यश न मिळ्याने राजीनामा - नितीश कुमार
बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
May 17, 2014, 05:09 PM ISTनीतीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.
May 17, 2014, 05:00 PM ISTपाहा बिहारमध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
May 12, 2014, 07:06 PM ISTलोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा
लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.
May 12, 2014, 08:39 AM ISTलोकसभा निवडणूक : मोदी, केजरीवाल, अजय राय यांची कसोटी
लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली असून या टप्प्यात जवळपास ९ कोटी मतदार ६,०६० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यामध्ये वाराणशीत भाजपाचे नरेंद्र मोदी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अजय राय यांची कसोटी आहे.
May 12, 2014, 07:53 AM ISTलालूंना मत दिले म्हणून पत्नीवर पतीचा गोळीबार
बिहारच्या उजियापूर मतदारसंघातील मोहिनुद्दिननगर येथे पतीने पत्नीला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, पत्नीने लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला मतदान केले.
May 7, 2014, 09:17 PM ISTलोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
May 7, 2014, 08:04 AM ISTगिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी
वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.
Apr 22, 2014, 10:34 PM ISTवस्तऱ्यानं घेतला जीव, दाढी करणं पडलं महागात
बिहारमधील नालंदा इथं एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दाढी करणं त्याला चांगलंच महागात पडलंय. केशकर्तनकाराकडून चुकीच्या पद्धतीनं वस्तरा चालविण्यात आल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस आता केशकर्तनकाराचा शोध घेत आहेत.
Apr 15, 2014, 10:21 AM ISTलालू प्रसाद यादव - किंग नही किंगमेकर हूँ
बिहारमध्ये अनेक वर्षे सत्ता लालू प्रसाद यादव यांनी भोगली. मात्र, विकासाच्या नावाने बोंब दिसून आली. लालूंच्या काळात घोटाळे उघड झालेत त्यानंतर लालूंची सत्ता गेली. आपली सत्ता हातातून जाणार असे लक्षात येतात आपली पत्नी राबडीदेवी यांना राजकारणात उतरवलं.
Apr 4, 2014, 06:36 PM ISTनरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये सौम्य लाठीचार्ज
बिहार पोलिसांनी आज गया इथं जमावाला नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गया इथं सभा होती. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वी हा गोंधळ गांधी मैदानावर सुरू झाला.
Mar 27, 2014, 05:30 PM ISTशत्रुघ्न सिन्हांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांना चोपले
शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवणाऱ्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोप चोपले. त्यामुळे पाटणा साहेब मतदार संघात वातावरण तंग होते.
Mar 21, 2014, 04:59 PM ISTबिहार भाजपमध्ये कलह, बिहारी बाबूंनी केलं `खामोश`!
लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होताच घमासान सुरू झालंय. २५ उमेदवारांच्या या यादीत पटना साहिबचे खासदार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव नसल्यानं ते नाराज असल्याचं समजतंय.
Mar 14, 2014, 03:41 PM ISTभाजपला मिळाले लालूंचे `राम`!
आरजेडीचे संस्थापक सदस्य आणि लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे रामकृपाल यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
Mar 12, 2014, 04:28 PM IST