मुंबईत गेल्या 10 वर्षातल्या दुसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद
ऑक्टोबर हीटच्या झळांमध्ये मुंबईकर अक्षशः होरपळून निघतायत. तापमानचा पारा काल दशकातल्या सर्वोच्च पातळीवर होता. पुढचे काही दिवस उन्हाची काहिली अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं म्हटलं आहे. रविवारी दिवसा मुंबई उपनगरातील तापमान ३७.८ अंशांपर्यंत चढलं.
Oct 8, 2018, 04:10 PM ISTधुळे आणि नंदुरबारमध्ये बसतायंत उन्हाचे चटके
एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र सूर्यनारायण प्रचंड आग ओकतोय. या दोन्ही जिल्ह्याती तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस पर्यंत कायम आहे. शुक्रवारी तर धुळे जिल्ह्याती ४३. ६ तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. या दोन्ही जिल्ह्यात दिवसागणिक तापमान वाढतच चालले आहे.
May 6, 2017, 08:43 AM ISTविदर्भात २४ तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता
राज्यात सूर्य नारायण आग ओकतच आहे. त्यामुळे उन्हाची काहिली काही केल्या कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातच विदर्भात पुढल्या २४ तासांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे.
Apr 22, 2017, 05:24 PM ISTउत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढणार
उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढेल आणि पर्यायानं कमाल तापमानही वाढेल, असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलं आहे.
Mar 27, 2017, 04:42 PM IST