मराठा रणरागिणींचा एल्गार, सरकारला दिला इशारा
आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.
Aug 9, 2017, 01:46 PM ISTमराठा आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईत भगवं वादळ धडकलं आहे. मुंबईचं वातावरण मराठामय झालं आहे. तर दुसकरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधीच आमदार आक्रमक झाले होते. अखेर विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं.
Aug 9, 2017, 12:44 PM ISTमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान
मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे
Aug 9, 2017, 12:06 PM ISTमुंबईतील वातावरण झालं 'मराठा'मय
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रणशिंग थोड्याच वेळात मुंबईत धडकणार आहे. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चेकरी मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वातावरण मराठामय झाला आहे. सांगली, सातारा, सोलापूर येथून मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हातात भगवे झेंडे घेत उपनगरांमधून देखील मराठा तरुण मुंबईत दाखल होतो आहे.
Aug 9, 2017, 11:08 AM ISTमराठा मोर्चा : मुंबईला छावणीचे स्वरुप, आज मुंबई थांबणार
कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठ्यांचे वादळ काही वेळातच राजधानी मुंबईत धडकणार आहे. मोर्चासाठी राज्याचा कानाकोपऱ्यातून मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. रात्रीपासूनच मुंबईत मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मोर्चाचा परिणाम सुरू झाला असून, अनेक मार्गावरील वाहतूक संथ झाली आहे.
Aug 9, 2017, 09:57 AM ISTमराठा मोर्चाला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याची शक्यता
मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना, रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबाईतील मराठा मोर्चा ला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याचा आयोजकांना विश्वास आहे. मुंबईत 500 शाळांना सुटी तर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
Aug 9, 2017, 08:59 AM IST