पुढची लढाई 'राईट टू रिकॉल' - अण्णा
लोकपाल विधेयकावर लोकसभेत गरमागर चर्चा सुरू असता ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालाबाबत जोरदार आक्षेप घेतला. यावेळी केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली. आता पुढची लढाई 'राईट टू रिकॉल' ची असेल असे अण्णा यांनी मुंबईत जाहीर केले. सरकारविरोधात एकत्र लढण्यासाठी अण्णांनी रामदेवबाबांना हाक दिली आहे. तर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
Dec 27, 2011, 05:44 PM ISTलोकपाल संसदेत ‘सादर’, नाही झाला ‘आदर’
बहुप्रतिक्षित लोकपाल बिल आज अखेर संसदेत मांडण्यात आलं. पीएमओ मंत्री नारायण सामी यांनी हे ऐतिहासिक बिल लोकसभेत सादर केलं. मात्र लोकपाल संसदेतही विरोधाच्या गर्तेत असल्याचं लगेचच स्पष्ट झालं. लोकपालच्या अनेक मुद्द्यांना आक्षेप घेत, भाजप, सपा, राजद, शिवसेना आणि भाकपनं या बिलाला वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोध दर्शवला.
Dec 22, 2011, 08:49 PM ISTसेनेचा लोकपाल आधी विरोध, आता पाठिंबा
लोकपाल विधेयकाला शिवसेना संसदेत पाठिंबा देणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशींनी पुण्यात दिली आहे. त्यामुळं एकंदरीत लोकपालच्या मुद्यावर सुरूवातीला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यु टर्न घेतल्याचं दिसून येतंय.
Dec 18, 2011, 04:59 PM IST